पिंपरी-चिंचवड

महापालिकेच्या आयटीआय विद्यार्थ्यांना विद्यावेतन

CD

पिंपरी, ता. ९ : पिंपरी-चिंचवड महापालिका संचालित आयटीआयमध्ये (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यावेतन लागू केले जाणार आहे. या प्रस्तावाला महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून दरमहा ५०० रुपये इतके विद्यावेतन देण्यात यावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या धर्तीवर मनपा आयटीआयच्या विद्यार्थ्यांनाही ५०० रुपये इतके विद्यावेतन द्यावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवला होता. मात्र, सदर प्रशिक्षण केवळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनाच योजना लागू करता येईल. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे कळवले होते.

त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देण्याबाबत आयुक्तांनी मान्यता दिली. दरवर्षी सुमारे ९०० प्रशिक्षणार्थ्यांचे ५०० रुपये प्रमाणे ४ लाख ५० हजार रुपये प्रतिमहिना खर्च महानगरपालिका स्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, या पुढील काळात आयटीआयमध्ये ट्रेड वाढल्यास त्या विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन देय राहील, असे धोरण ठरवण्यात आले आहे.


सर्वसामान्य कुटुंबातील या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि शहरातील औद्योगिक कंपन्यांमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. त्यानुसार राज्य शासनाच्या धर्तीवर मनपा आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळावे, अशी मागणी केली होती. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रतिवर्षी सुमारे ९०० विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT