पिंपरी-चिंचवड

मेळाव्यातून पोलिसांच्या १३६ पाल्यांना रोजगार

CD

पिंपरी, ता. १० : पिंपरी-चिंचवड हद्दीतील पोलिसांच्या पाल्यांसाठी बुधवार (ता. ९) एसएनबीपी इंटरनॅशनल शाळेत रहाटणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात ३७ कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये पोलिसांच्या १३६ पाल्यांना रोजगार मिळाला. तर, ५२ जणांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
राज्य शासनाच्या १०० दिवसीय कृती कार्यक्रमाअंतर्गत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यावेळी चौबे यांच्यासह अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, उपायुक्त विशाला गायकवाड, सहायक आयुक्त सुनील कुऱ्हाडे आदींसह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, एचआर उपस्थित होते. या मेळाव्याला २५० हून अधिक पोलिस पाल्य उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी चौबे म्हणाले, ‘‘पोलिस पाल्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे. तसेच आपली मेहनत, अपार कष्ट, शिस्त व जबाबदारीचे पालन करून आपला आणि नियुक्त होणाऱ्या कंपनीचा उत्कर्ष करावा. जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

आश्रम ३ मधील इंटीमेट सीनवर पहिल्यांदाच बोलला बॉबी देओल, म्हणाला, 'मी फार घाबरलो होतो'

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT