पिंपरी-चिंचवड

आजी-माजी आमदारांना अजित पवार यांच्या कानपिचक्या विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा काळेवाडीत नागरी सत्कार

CD

पिंपरी, ता. ९ ः ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’, अशी अण्णा बनसोडे यांची ख्याती आहे. त्यांना खूप मोठे पद मिळाले आहे. आता सर्वांचे बारीक लक्ष राहणार आहे. आपल्या चिरंजीवांना चांगल्या चार गोष्टी सांगा, मी पण माझ्या चिरंजीवांना सांगत असतो. ‘गडी अंगाने उभा नी आडवा’ म्हणत एका ठिकाणी राहून काम करावे लागते. तळ्यात-मळ्यात चालणार नाही,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजी-माजी आमदारांचे कान टोचले.
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची नुकतीच विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली. यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांचा काळेवाडी येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार केला. त्यात ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट आदींसह महायुतीतील घटक पक्षांचे काही पदाधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘महायुतीचे सरकार निवडून आल्यानंतर विरोधकांनी आमच्यावर आरोप केले. पण, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार सत्तेत आले. आमच्यावर टीका केली तरी चालेल पण, गरिबांचा विचार आम्ही कधी सोडणार नाही. आर्थिक शिस्त बाळगून शहरांचा विकास केला पाहिजे. विमानतळ करताना काही भूधारकांच्या जमिनी जात आहेत. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असताना त्याला विरोध करणे योग्य नाही. रिंगरोडचेही काम मार्गी लागत आहेत. यात देखील स्थानिकांच्या जमिनी जाणार आहेत. पण, त्यांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. त्यांना चांगला मोबदला दिला जाईल. शहरातील मेट्रो चाकण एमआयडीसीपर्यंत केली जाणार आहे. वाकड, रावेतचा भाग मेट्रोला जोडला जाणार आहे.’’

अजित पवार म्हणाले....
- इंद्रायणी आणि पवना नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- नदी सुधार प्रकल्पाबाबत काहींचे वेगळे मत आहे, त्याचा जरूर विचार केला जाईल.
- चांगल्या गोष्टींसाठी दोन पाऊले पुढे किंवा मागे येण्याची आमची तयारी आहे.
- पिंपरी-चिंचवडसाठी पवना धरणाचे पाणी कमी पडत आहे.
- भामा-आसखेडचे पाणी आणले जात आहे, आंद्रा धरणातील पाणी घेत आहोत, तरीही पाण्याची कमतरता भासत आहे.
- यापुढील पन्नास वर्षाचा विचार करून, पाण्याचे नियोजन करावे लागेल.
- पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी कसे आणता येईल, यासाठी प्रयत्न केले जातील.
- पीएमआरडीएच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करताना शंभर मीटरहून अधिक मोठे रस्ते केले जाणार आहेत.
- म्हाडा, एसआरए, महापालिका, पीएमआरडीएच्या माध्यमातून गृहनिर्माणाला चालना दिली जाणार आहे.

सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविणार ः बनसोडे
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर बसवण्याची दानत राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यातच आहे. एवढ्या मोठ्या पदावर बसलो असलो तरी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पिंपरी मतदार संघातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पदाचा उपयोग करेन, अशी कृतज्ञता विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली.

फोटो ः 05159

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Venezuela Earthquake: काही मिनिटांत दोन महाभूकंप; इमारतींचे ढिगारे, १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती... क्षणात उद्ध्वस्त झालं शहर

Ketan Agarwal Case : चेतनच्या कृत्यामुळे कुटुंब धास्तावले; फ्लॅटला कुलूप लावून रातोरात झाले पसार!

US-Iran Conflict: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! इराणविरोधातील लष्करी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकी सिनेटमध्ये मंजूर

Jamun Sharbat: पावसाळ्यातला थकवा दूर करतं जांभळाचं हे खास सरबत; एकदा प्याल तर पुन्हा पुन्हा मागाल

Baramati AI Farming: बारामतीचा आवाज थेट संयुक्त राष्ट्रांपर्यंत! शेतकऱ्यांसाठी विकसित ‘एआय’ संशोधनाची रोममधील जागतिक परिषदेसाठी निवड

SCROLL FOR NEXT