पिंपरी-चिंचवड

‘पॅट’ परीक्षा सुरू, प्रश्नपत्रिकांचा तुटवडा

CD

पिंपरी, ता. १० : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एमएससीईआरटी) घेतल्या जाणाऱ्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी-२ (पॅट-प्रोग्रेसिव्ह ॲसेसमेंट टेस्ट) परीक्षेला वेळापत्रकानुसार सुरुवात झाली आहे. शहरातील महापालिका आणि अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी १ लाख २८ हजार ६१ प्रश्‍नपत्रिका पुरवण्यात आल्या आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या ६५ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
शिक्षण विभागाने ८ ते २५ एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा आणि ‘पॅट’ एकाच वेळी घेण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षांप्रमाणेच यंदाही प्रश्‍नपत्रिका कमी पडल्याची ओरड काही मुख्याध्यापक-शिक्षकांनी केली. स्थानिक परिस्थितीनुसार शिक्षणाधिकारी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करू शकतात, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यानुसार, शिक्षण विभागाने तातडीने सध्याच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. प्राथमिक वर्गांच्या परीक्षा सकाळच्या सत्रांत उरकण्याची तयारी काही शाळांनी केली आहे.

ाया विषयांची चाचणी
बुधवारी पाचवीची मराठी भाषा, तर आठवी आणि नववीची तृतीय भाषा म्हणजे इंग्रजीची परीक्षा झाली. ११ एप्रिलला पाचवीची इंग्रजीची, आठवी आणि नववीची गणिताची चाचणी होईल. १९ एप्रिलला सहावी आणि सातवीच्या संकलित चाचणीला सुरुवात होईल.

‘विनाअनुदानित’ला नाही प्रश्‍नपत्रिका
काही शाळांना पाच, तर काही शाळांमध्ये २५ ते ३० प्रश्‍नपत्रिकांचा तुटवडा आहे. या प्रश्‍नपत्रिकांच्या कोणत्याही झेरॉक्स, प्रिंट काढू नयेत. याची पीडीएफ कुठे शेअर करू नये, अशा सूचना परिषदेने शाळांना दिल्या आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका पुरविणार कशा, असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. झेरॉक्स काढून प्रश्‍नपत्रिकांची पूर्तता करावी लागत असल्याची ओरड काही शाळांकडून झाली. तर ‘‘अनुदानित शाळांना प्रश्‍नपत्रिका मिळते, पण विनाअनुदानित शाळांना नाही,’’ असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


आकडेवारी

आकुर्डी शहर साधन केंद्र
माध्यम -माध्यम निहाय वाटप
मराठी -६५, ७६५
इंग्रजी -२२०४
हिंदी -४६१६
उर्दू -२५२०
एकूण -७५, १०५


पिंपरी शहर साधन केंद्र
माध्यम -माध्यम निहाय वाटप
मराठी -४०, ६२७
इंग्रजी -७३२४
हिंदी -२१८५
उर्दू -२८२०
एकूण -५२, ९५६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT