पिंपरी-चिंचवड

रुग्णांकडून अनामत रक्कम घेऊ नका

CD

पिंपरी, ता. १० : रुग्णांकडून कोणत्याही प्रकारे अनामत रक्कम घेऊ नये, अशा आशयाची नोटीस पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील ६५० खासगी रुग्णालयांना बजावली आहे.
याबाबत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने काढलेल्या परिपत्रकात खासगी रुग्णालयांनी दि बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट १९४९ व महाराष्ट्र शासन अधिसूचना यांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
‘‘पिंपरी ‍चिंचवड महापालिका हद्दीतील खासगी हॉस्पिटल, नर्सिंग होम्स, रुग्णालये येथील प्रशासनाने रुग्णांसोबत सौजन्यपूर्ण व्यवहार करणे अपेक्षित आहे. रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने सेवा द्यावी. गरजेनुसार वैद्यकीय टिप्पणीसह लवकरात लवकर अशा रुग्णांना सोयीच्या आणि जवळील रुग्णालयात पाठवावे. रुग्णाच्या जीविताचे पालन करण्यासाठी ‘गोल्डन अवर ट्रीटमेंट’ या निकषाचे पालन करावे, रुग्णालयाच्या सेवा व्याप्तीनुसार जीवित रक्षणासाठी आपत्कालिन सुविधा, साधनसामग्री तसेच प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञ व कर्मचारी असावेत. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णांवर त्वरित उपचार करावेत’’ अशा सूचना या परिपत्रकात देण्यात आलेल्या आहेत.


‘गोल्डन अवर ट्रीटमेंट या निकषाचे पालन काटेकोरपणे करणे बंधनकारक आहे. शहरातील सर्व खासगी रुग्णालयांनी दि बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार रुग्णांवर त्वरित उपचार करणे अपेक्षित आहे.
-डॉ.लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG दरवाढीचा नवा धक्का! गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ... मुंबई-पुण्यात दर किती?

'तो संपूर्ण रात्र दुसऱ्या महिलेसोबत राहिला तरी...' तबिंदा सनपाल नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...'तो दर दिवाळीत तीन किलो सोनं देतो'

Chandgad Drowning Child : आजीच्या निधनामुळे गावी गेल्या अन् तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, चंदगडमधील घटना; लहान भावाचे प्रयत्न असफल...

Buldhana Tragedy: पत्नीशी वादानंतर टोकाचे पाऊल! चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवले, बुलडाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Maharashtra Accident: सोमवार ठरला ‘अपघातवार’; एकच दिवशी १४ जणांचा मृत्यू, आंबेनळीत मोटार कोसळून आठ तर तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT