पिंपरी-चिंचवड

शहरात महावीर जयंती उत्साहात पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्यावतीने अहिंसा रॅली व पदयात्रा

CD

पिंपरी, ता. १० ः पारंपारिक वेशभूषा केलेले तरुणाई, पांढरे पोशाख परिधान केलेले व जैन धर्माचे झेंडे हातात घेऊन दुचाकीवर स्वार झालेले जैन बांधव, ढोल ताशा पथके आणि जैन धर्माचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा सजविलेला रथ अशा वातावरणात पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेली अहिंसा रॅली व अहिंसा पदयात्रा पार पडली. जैन धर्मातील शेकडो बांधव यात मोठ्या उत्साहात सहभागी झाले. यामध्ये महिला व लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता.
गुरुवारी (ता. १०) सायंकाळी चारच्या सुमारास रावेत येथील आठवडे बाजार येथून दुचाकी रॅलीला सुरवात झाली. शिंदे वस्ती, रावेत, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज रस्ता, भेळ चौक, निगडी, बिजलीनगर, वाल्हेकर वाडी येथून ही पदयात्रा पाच वाजता आरएमडी जैन स्कूल येथे पोचली. तेथून प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. सायंकाळी सहा वाजता पदयात्रेचा समारोप प्रेक्षागृह येथे झाला.
दरम्यान, पिंपरी चिंचवड जैन महासंघ, श्री वर्धमान जैन श्रावक संघ आणि श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट यांच्या वतीने ४ ते १० एप्रिल दरम्यान अहिंसा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सात दिवसांमध्ये विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (ता. १०) सकाळी रक्तदान शिबिर पार पडले. त्यानंतर नेत्रदान न दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी अहिंसा रॅलीनंतर प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या भक्ती संध्या कार्यक्रमाने अहिंसा सप्ताहाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT