सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाची पिंपरी-चिंचवड ते गडहिंग्लज बससेवा ६ एप्रिलपासून सुरू झाली आहे. या बस दिवसातून दोन वेळा सुटणार आहेत. त्यामुळे सातारा, कोल्हापूर आणि लगतच्या जिल्ह्यांत जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात शिक्षण, रोजगार आणि व्यावसायानिमित्त कोल्हापूर, सातारा आणि सांगली या भागातील नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. गणेशोत्सव, दिवाळी, उन्हाळी सुट्टीत नागरिक हमखास गावी जातात. पण, वल्लभनगर आगारातून गडहिंग्लजसाठी थेट बस सुरू नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. नागरिकांना मुंबईहून येणाऱ्या एसटी बसमधून दाटीवाटीने प्रवास करावा लागत होता. प्रसंगी स्वारगेट किंवा नवीन शिवाजीनगर आगारात (वाकडेवाडी) स्थानकात जावे लागत होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातून थेट गडहिंग्लजसाठी बस सुरू करण्याची मागणी होती. त्यावर गडहिंग्लज आगाराने निगडीपर्यंत सेवा सुरू केली आहे. भक्ती शक्ती चौक स्थानक येथून ही बस सुटत आहे.
पिंपरी-चिंचवडसाठी बससेवा सुरू केली आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास आता वर्षभर ही सेवा सुरू राहणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना या बसचा फायदा होणार आहे.
- गुरूनाथ राणे, आगार प्रमुख, गडहिंग्लज
पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या गडहिंग्लज भागातील नागरिकांसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी आम्ही आगार प्रमुखांकडे केली होती. अखेर ती मान्य झाली असून बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सुविधा निर्माण झाली आहे.
- वसंत पाटील, ज्योतिर्लिंग मित्र मंडळ
असे आहे वेळापत्रक
निगडी-गडहिंग्लज - सकाळी : ७.३०, रात्री : ९.००
गडहिंग्लज-निगडी - सकाळी : ९.३०, रात्री : ८.३०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.