पिंपरी, ता. १३ ः ‘‘अंतर्मनातील नाद समजून घेण्यासाठी आणि स्वतः मधला विठ्ठल शोधण्यासाठी सर्वांनी ‘अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी (ता.१६) सायंकाळी ७ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात येऊन पाहावा,’’ असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व मोरया थिएटरचे संस्थापक, ‘अंतर्नाद’चे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी केले.
पिंपरी आचार्य अत्रे सभागृह येथे बुधवारी (ता. १३) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भोईर बोलत होते. यावेळी प्रणव सपकाळे, दिग्दर्शक मनोज डाळिंबकर, संगीतकार निरंजन पेडगावकर, अंकिता शिवतरे, राजू बंग आदी उपस्थित होते.
भोईर म्हणाले, ‘‘पंढरीच्या वारीत सहभागी होण्याचे आत्मिक समाधान देण्याचा प्रयत्न ‘अंतर्नाद’ नाटकातून करण्यात आला आहे. ५१ कलाकारांचा सहभाग असलेल्या या प्रयोगात अभंग, गवळण, भारुड, पोवाड्याचा समावेश आहे.’’
नाटकाचे लेखन विनोद रत्ना यांनी केले असून मुराद तांबोळी यांनी गीते शब्दबद्ध केली आहेत. नृत्यदिग्दर्शन अंकिता शिवतरे व सौगंध कापसे यांनी केले आहे. तांत्रिक बाजू अभिप्राय कामठे (प्रकाश योजना), कमलेश बिचे (रंगभूषा) आणि वेदिका काळे (वेशभूषा) यांनी सांभाळली आहे. सहाय्यक दिग्दर्शन आकाश थिटे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.