पिंपरी-चिंचवड

भाजपची राष्ट्रवादीवर कुरघोडी

CD

पीतांबर लोहार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १३ : क्षेत्रीय कार्यालयांच्या (प्रभाग समिती) संख्येत दोनने वाढ करून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी करण्यास यशस्वी झाला आहे. यामुळे सर्व दहाही क्षेत्रीय समित्यांवर वर्चस्व राखत, अध्यक्षपदे भाजपकडेच राहतील.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २९-अ मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रभाग समित्यांची स्थापना करण्याचे प्रयोजन आहे. त्या अनुषंगाने प्रशासनिक सोय आणि लोकाभिमुख सेवा अधिक परिणामकारकपणे देण्यासाठी महापालिकेच्या विद्यमान आठ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव होता. १३ मार्च २०२६ च्या महापालिका सभेत त्याबाबत निर्णय घेऊन १० प्रभाग समित्यांची स्थापना केली आहे. त्यानुसार ३२ निवडणूक प्रभागांची विभागणीही प्रभागनिहाय केली आहे. त्याची अंमलबजावणी २५ मे २०२६ पासून केली जाणार आहे.

‘राष्ट्रवादी’ला केराची टोपली
क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आठवरून दहा करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वसाधारण सभेत विरोध केला होता. सध्याच्या रचनेनुसार आठपैकी दोन समित्यांवर शिवसेनेच्या मदतीने राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले असते. त्यामुळे दोन समित्यांचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले असते. हे होऊ नये म्हणूनच क्षेत्रीय कार्यालय रचनेत बदल केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला होता. शिवाय, ‘आम्हाला अध्यक्षपद नको, ते तुमच्याकडेच ठेवा. परंतु, महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करून आठच क्षेत्रीय कार्यालये राहू द्या,’ अशी मागणीही राष्ट्रवादीने केली होती. मात्र, तिला केराची टोपली दाखवत भाजपने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केला होता. त्यावर आता महापालिका आयुक्तांनी स्वाक्षरी केली आहे.

प्रभाग समित्या का?
- महापालिका प्रशासकीय कामकाजाची कार्यक्षमता वाढवणे
- नागरिकांना अधिक सुलभ व तत्पर सेवा उपलब्ध करून देणे
- वाढती लोकसंख्या व भौगोलिक कार्यक्षेत्राचा विचार करणे

असे असेल पक्षीय बलाबल
क्षेत्रीय कार्यालय (नाव आणि प्रभाग क्रमांक) / भाजप / राष्ट्रवादी / शिवसेना
अ (राजगड) ः १३, १४, १५) / ८ / ३ / १
ब (सिंहगड) ः १७, १८, १९) / ८ / ४ / -
क (विजयदुर्ग) ः २, ९, १०) / ८ / ४ / -
ड (देवगिरी) ः २१, २७, २८, २९) / १० / ६ / -
ई (शिवनेरी) ः ३, ४, ५) / ११ / १ / -
फ (तोरणा) ः १, ११, १२) / ८ / ४ / -
ग (पुरंदर) ः २२, २३, २४) / ७ / ३ / २
ह (प्रतापगड) ः ३०, ३१, ३२) / ७ / ५ / -
ज (रायगड) ः १६, २५, २६) / ९ / - / ३
ल (लोहगड) ः ६, ७, ८, २०) / ९ / ७ / -

महापालिकेत पक्षीय बलाबल
पक्ष / संख्या
भाजप / ८५
राष्ट्रवादी / ३७
शिवसेना / ६
(तिन्ही पक्ष राज्य व केंद्र सरकारमध्ये महायुतीचे घटक आहेत)

दृष्टिक्षेपात राजकीय विश्लेषण....
- १० पैकी सात क्षेत्रीय कार्यालयांत शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही
- ज क्षेत्रीय कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही प्रतिनिधी नाही
- दहाही क्षेत्रीय कार्यालयांत भाजपचे बहुमत
- आठ क्षेत्रीय कार्यालयांत प्रत्येकी तीन प्रभागांचा समावेश
- ‘ड’ आणि ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयांत प्रत्येकी चार प्रभागांचा समावेश
- ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात राष्ट्रवादीचा केवळ एक प्रतिनिधी
- ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात भाजप समर्थक एका अपक्ष नगरसेवकाचा समावेश
- जुन्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेनुसार दोन समित्यांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व
- जुन्या रचनेनुसार दोन समित्यांचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आले असते
- प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेबाबतचा निर्णय २५ मे २०२६ पासून लागू होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking: वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड, तिलक वर्मा कॅप्टन! तिरंगी मालिकेसाठी संघ जाहीर

Sharad Pawar: “कुणी बाइकवर, कुणी पायी... पण हा फक्त दिखावा”; शरद पवारांचा नेत्यांच्या ताफ्यावर प्रहार, म्हणाले दीर्घकालीन धोरण हवे

Latest Marathi News Live Update : शिवसागर जलाशयात बोट बुडाली; पर्यटक वाचले पण चालक बेपत्ता

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांवर असतो जणू देवाचाच हात; मोठ्या संकटातून अनेकदा बचवतात, कोणीच यांना हरवू शकत नाही

स्मिता पाटील यांचा कधी न पाहिलेला फोटो, प्रतीक बब्बर शेअर करत म्हणाला...'आईने मला...'

SCROLL FOR NEXT