पिंपरी-चिंचवड

‘प्रवासी राजा दिन’ कागदावरच

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना यांचा स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा करण्यासाठी ‘प्रवासी राजा दिन’ उपक्रम सुरु केला. प्रत्येक आगारात दर बुधवारी हा उपक्रम राबवण्याचे लेखी आदेश प्रशासनाने दिले. मात्र, गेल्या तीन महिन्यांत वल्लभनगर आगारात एकदाही हा उपक्रम झालाच नाही. अशीच परिस्थिती पुणे विभागातील इतर आगारांची सुद्धा आहे. त्यामुळे ‘प्रवासी राजा दिन’ उपक्रम कागदावरच आहे की काय ? असाच प्रश्‍न उपस्थित होत आहे.
एसटी वेळापत्रकानुसार धावत नाही, ठरलेल्या थांब्यावर एसटी थांबत नाही, अवैध थांब्यावर बस थांबविली जाते, पैसे घेऊन तिकीट दिले जात नाही, चालक, वाहकाकडून असभ्य वर्तणूक, बसस्थानकावरील शौचालय अस्वच्छ अशा विविध गैरसोयींबाबत प्रवाशांना तक्रारी मांडता याव्यात, त्यांचा जलद आणि स्थानिक पातळीवरच निपटारा व्हावा यासाठी १५ जूलै २०२४ रोजी हा उपक्रम सुरू करण्यात आला. सुरवातीला दर सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ ही वेळ निश्‍चित करण्यात आली. मात्र मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात सोमवार ऐवजी बुधवार हा दिवस निश्‍चित करण्यात आला.
पुणे विभागाने दर बुधवारी हा उपक्रम प्रत्येक आगारात राबवण्याऐवजी फक्त १४ पैकी एका आगारात राबवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे काही दिवस हा उपक्रम विविध आगारात राबविण्यात आला. मात्र, त्यानंतर हा उपक्रम नियमीत झालाच नाही. तसेच या उपक्रमाबाबत प्रवासी किंवा प्रवासी संघटनांना पूर्वकल्पना देण्यात आलीच नाही. त्यामुळे प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या समस्या, तक्रारी, सूचना मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध झालेच नाही. महामंडळाचा लेखी आदेश असूनही पुणे विभाग या आदेशाचे पालन करत असल्याची टीका प्रवाशांकडून होत आहे.
-----------
प्रत्येक आगारात का नाही ?
प्रत्येक आगारात दर बुधवारी उपक्रम राबविण्याचा प्रशासनाचा आदेश आहे. मग पुणे विभागातील प्रत्येक आगारात हा उपक्रम राबविला जात का नाही. पुणे विभागात १४ आगार असल्यामुळे एका आगारात हा उपक्रम राबविण्यासाठी सुमारे अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. या कालावधीत नागरिकांच्या समस्या सोडवणारच नाहीत का असा प्रश्‍न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
------------
प्रवासी राजा दिन हा उपक्रम कोणत्या आगारात कधी होणार आहे, याची माहिती एसटी प्रशासनाने वेळोवेळी दिली पाहिजे. पण, हा उपक्रम कधी होऊन जातो याची माहितीच होत नाही. होतो की नाही हीच शंका आहे.
- राजाराम निकम, प्रवासी

प्रवासी राजा दिन उपक्रम सुरु आहे. येथून पुढे प्रवाशांना या उपक्रमाची आणि प्रत्येक आगारात कधी होणार आहे याची माहिती कळावी यासाठी आगारात सूचना फलकावर नोटीस सूचना लावण्यात येईल.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

Silver Import: सोनेनंतर आता चांदीवरही केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवे नियम लागू केले; आता अतिरिक्त मंजुरी लागणार

SCROLL FOR NEXT