पिंपरी, ता. १४ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) गृहयोजनेतील ३९९ विजेत्यांनी सदनिका स्वीकारल्या आहेत. तर, उर्वरित चार २६३ अर्जदारांची अनामत रक्कम पुढील १५ दिवसांत थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यानंतरही प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना रिक्त सदनिकांसाठी संधी दिली जाईल.
‘पीएमआरडीए’ने पेठ क्रमांक १२ आणि ३०-३२ मधील १,०२९ सदनिकांसाठी आठ एप्रिल रोजी सोडत काढली होती. यात ८७१ लाभार्थी पात्र ठरले होते. सदनिका स्वीकारण्यासाठी २४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, ज्यामध्ये ३९९ जणांनी संमती दर्शवली. ज्यांनी सदनिका नाकारल्या आहेत किंवा जे सोडतीत अयशस्वी झाले, अशा सर्व अर्जदारांना त्यांच्या अर्जासोबत जोडलेल्या बँक खात्यांत परतावा मिळेल.
सोडतीची माहिती
एकूण अर्जदार : ५,३१७
सोडतीत यशस्वी अर्जदार : ८७१
प्रतीक्षा यादीतील अर्जदार : ६५५
सदनिका नाकारणारे अर्जदार : ४७२
सदनिका स्वीकारणारे अर्जदार : ३९९
सोडतीमधील पारदर्शकता आणि लाभार्थ्यांची सोय लक्षात घेऊन आम्ही अनामत रकमेची परतावा प्रक्रिया तातडीने राबवत आहोत. १५ दिवसांत पैसे संबंधितांच्या खात्यात जमा होतील. तसेच, प्रतीक्षा यादीनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- पूनम मेहता, सहआयुक्त, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.