पिंपरी-चिंचवड

आजच ठरवा, ‘आपले झाड कोणते?’

CD

पिंपरी, ता. २८ ः वृक्षारोपण म्हणजे केवळ झाड लावणे नव्हे, तर आपण लावत असलेल्या झाडाची प्रजाती, त्याचे स्थानिक पर्यावरणातील महत्त्व आणि त्यातून निर्माण होणाऱ्या जैवविविधतेची भूमिका समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने ‘ग्रीन रिइमॅजिन्ड’ उपक्रमांतर्गत ‘सकाळ माध्यम समूह’ आणि यशदा रिॲल्टी यांनी ‘तुमचे झाड कोणते?’ असे आवाहन करत वृक्षारोपणासाठी सहा सप्टेंबर रोजी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. तेही आपल्या नजीकच्या पुनावळेतीन वन विभागाच्या जागेत. तेव्हा सज्ज व्हा! आणि रविवार सुट्टीचा मुहूर्त साधत सहा सप्टेंबरला वृक्षारोपणाला या! आणि विविध वृक्षप्रजातींची ओळख करून घ्या!
वृक्षारोपणाच्या पारंपरिक संकल्पनेपलीकडे जाऊन प्रत्येक झाडाकडे एका स्वतंत्र विचाराने पाहण्याची गरज ‘ग्रीन रिइमॅजिन्ड’ उपक्रमातून अधोरेखित केली जात आहे. कारण, पिंपरी चिंचवड शहर परिसर झपाट्याने विकसित होत आहे. अशा शहरामध्ये आणि त्यालगतच्या ग्रामीण भागात वृक्षलागवड करताना कोणती प्रजाती निवडली जाते?, ती त्या परिसरातील हवामान आणि मातीशी कितपत अनुकूल आहे?, तसेच स्थानिक पक्षी, फुलपाखरे, कीटक आणि इतर जीवसृष्टीला तिचा किती फायदा होतो?, याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळेच ‘ग्रीन रिइमॅजिन्ड’ अंतर्गत लावलेल्या झाडांच्या प्रजातींची ओळख करून देताना नागरिकांना त्या झाडांचे वैशिष्ट्ये, वाढीची पद्धत, पर्यावरणीय उपयोग आणि स्थानिक जैवविविधतेशी असलेले नाते समजावून सांगितले जाणार आहे. शिवाय, वृक्षारोपण केल्यानंतर त्याची देखभाल करण्याबरोबरच त्या झाडाशी भावनिक आणि पर्यावरणीय नाते निर्माण होण्यास मदत होणार आहे.

वृक्षारोपण उपक्रमाचा उद्देश
- स्थानिक वृक्षप्रजातींचे पर्यावरणीय महत्त्व पटवून देणे
- स्थानिक झाडे परिसरातील हवामान, माती आणि जीवसृष्टीशी दीर्घकाळापासून जुळलेली असल्याने अनेक पक्षी व कीटकांसाठी ती अन्न, निवारा आणि प्रजननाचे साधन ठरतात
- झाडांमुळे तापमान नियंत्रण, कार्बन शोषण, मातीची धूप रोखणे, पाण्याचे संवर्धन आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते
- योग्य वृक्षप्रजातींची निवड ही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरते
- ‘ज्या झाडाला लावणार आहात, त्याला आधी जाणून घ्या’ हा संदेश उपक्रमाचा केंद्रबिंदू

पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांसाठी...
- झाडाचे नाव, प्रजाती, वाढीसाठी आवश्यक जागा, पाण्याची गरज, संबंधित जैवविविधता यांची माहिती होणे आवश्यक
- वाढते शहरीकरण, बदलते हवामान आणि कमी होणारी जैवविविधता यामुळे वृक्षारोपणाकडे अधिक जबाबदारीने पाहण्याची आवश्यकता
- केवळ झाडांची संख्या वाढविण्याऐवजी योग्य झाडे, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने लावणे म्हणजे पर्यावरणपूरक वाटचाल
- ‘तुमचे झाड कोणते?’ हा उपक्रम म्हणजे वृक्षारोपणासह झाडाला जाणून घेणे, त्याच्या जतनाची नवी दृष्टी देण्याचा विश्‍वास
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सतेज पाटील थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरी; नवं समीकरण?

४३ वर्षांनंतर ‘मासूम’ची नवी कहाणी; ए. आर. रहमान यांनी रेकॉर्ड केली 3 गाणी

Ichalkaranji Child Death : दूध पिताना चिमुकल्याला ठसका लागून श्वास कोंडला अन्..., इचलकरंजीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना

Marathi News Live Updates : मृत्युमुखींची संख्या ४८९ वर पोहोचली; आतापर्यंत ३९३ मृतदेहांची ओळख पटली

Nepal Flood : नेपाळ-तिबेट सीमेवर जलप्रलयाचा थरार! महाभयंकर विनाशादरम्यान आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT