पिंपरी, ता. २१ : गणपती विसर्जन मिरवणुकांसाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त तैनात असणार आहे. दोन हजार ७२७ पोलिस अधिकारी-कर्मचारी, तसेच ५५० होमगार्ड बंदोबस्तासाठी असतील. यासह विविध पथकेही तैनात असणार आहेत.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा दोन हजार २५१ सार्वजनिक गणपती मंडळे आहेत. यातील पाचव्या दिवशी २९, सहाव्या दिवशी २, सातव्या दिवशी ५२८, आठव्या दिवशी २२ मंडळांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन झाले असून नवव्या दिवशी २५७, दहाव्या दिवशी २७६, अकराव्या दिवशी १३७ तर बाराव्या दिवशी ९९९ मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. या मिरवणुका शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी नियोजन चोख केले आहे.
पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलिसांच्या मदतीला ५५० होमगार्ड तैनात आहेत. गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचा परिसर, प्रमुख चौक, संवेदनशील ठिकाणे आणि विसर्जन मार्गांवर आवश्यकतेनुसार मनुष्यबळ तैनात केले आहे. तसेच एक बॉम्ब शोधक व नाशक पथक, चार आरसीपी पथके आणि १७ स्ट्रायकिंग पथकेही बंदोबस्तासाठी आहेत.
===========
*असा आहे बंदोबस्त
सहआयुक्त - १
अपर आयुक्त - १
उपायुक्त - ६
सहायक आयुक्त - ९
निरीक्षक - ६४
सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक - २९१
अंमलदार - २ हजार ३५५
होमगार्ड - ५५०
एसआरपीएफ - २ पथके
बीडीडीएस - १ पथक
आरसीपी - ४ पथके
स्ट्रायकिंग - १७ पथके
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.