पिंपरी-चिंचवड

सोमाटणे चौकात पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी

CD

सोमाटणे, ता. ८ : पावसाची उघडीप आणि मावळातील हिरवागार निसर्ग, धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी रविवारी मोठी गर्दी केली होती. मात्र, पर्यटकांच्या वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील सोमाटणे चौकात सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण वाहतूक कोंडी झाली. रस्ता अरुंद असल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
वीकेंड आणि निसर्गरम्य वातावरणामुळे शहरी भागातील पर्यटक मोठ्या संख्येने मावळात दाखल झाले होते. सोमाटणे चौकातील अरुंद रस्ता आणि एकाचवेळी महामार्गावर आलेली वाहनांची संख्या, यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या कोंडीमुळे नियमित प्रवास करणाऱ्या नोकरदार व स्थानिक प्रवाशांचे हाल झाले.

दोन तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक मोकळी
घटनेची माहिती मिळताच सोमाटणे वाहतूक पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, वाहनांच्या तुलनेत रस्त्याची रुंदी कमी असल्याने तब्बल दोन तास वाहने धिम्या गतीने सरकत होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वाहनांचा ओघ काहीसा ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
दरम्यान, सोमाटणे चौकात दर वीकेंडला होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येथे तातडीने रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांमधून केली जात आहे.

Smt८Sf१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

Raj Thackeray IIT Bombay : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टच बोलले; शिक्षणव्यवस्थेवरही सवाल

Marathi News Live Updates : 'आयुष्मान भारत' योजनेतंर्गत ६० कोटी भारतीयांना ५ लाखांचे आरोग्य कवच उपलब्ध- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Solapur Cyber Fraud,पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला ४५ लाखांचा गंडा, जादा नफ्याचे आमिष महागात; वर्षाला २८ लाखांचे आहे पॅकेज

SCROLL FOR NEXT