पिंपरी-चिंचवड

निगडीतील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

CD

पिंपरी, ता. ८ : भरधाव ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्रिवेणीनगर चौकात १ ऑगस्टला सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला होता. अभिजित श्रीशेल कुंचबळ (वय २४, रा. साईनाथनगर, निगडी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ आकाश यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला. ते तळवडे येथून साईनाथनगर येथे जात होते. पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. सात ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT