पिंपरी-चिंचवड

भोसरीतील गव्हाणे मंडळ प्रथम

CD

पिंपरी, ता. १० ः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ आयोजित केली होती. त्यात भोसरीतील दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळाने (शिव नृसिंह देखावा) प्रथम क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. पिंपरीतील सुवर्ण मित्र मंडळाने (रायगडावरचा शिवदरबार) द्वितीय क्रमांकाचे ४५ हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. पारितोषिक वितरण गुरुवारी (ता. १३) सायंकाळी सात वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होईल, अशी माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सोमवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे आयोजित गणेशोत्सव स्पर्धेत निगडीतील जय बजरंग तरुण मंडळ, जय हिंद मित्र मंडळ ट्रस्ट, भोसरीतील लांडगे लिंबाची तालीम मंडळ, पठारे लांडगे तालीम मित्र मंडळ, चिंचवडमधील गांधी पेठ तालीम मित्र मंडळ, एसकेएफ मित्र मंडळ आणि काळभोरनगरमधील राष्ट्रतेज तरुण मंडळ यांनी जय गणेश पुरस्कार पटकावला आहे. प्रमुख स्पर्धेत समस्त गव्हाणे तालीम भोसरी (तृतीय), छत्रपती शिवाजी मित्र मंडळ पिंपळे गुरव (चतुर्थ), समता मित्र मंडळ काळभोरनगर (पाचवे) यांनीही पारितोषिक मिळवले आहे.

विजेत्या शाळा
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय आकुर्डी, बाबूरावजी घोलप विद्यालय सांगवी, केंब्रिज स्कूल आकुर्डी, नृसिंह हायस्कूल सांगवी, प्रेरणा हायस्कूल थेरगाव, शकुंतला अनंतराव शितोळे स्कूल सांगवी, पीडीईएस इंग्लिश स्कूल आकुर्डी.

गृहनिर्माण सोसायट्या
स्वप्नपूर्तीचा राजा गणेश मित्र मंडळ प्राधिकरण, शुभम पार्क सोसायटी प्राधिकरण, शुभारंभ हाउसिंग सोसायटी चिखली, स्वराज्य ग्रुप सोसायटी मोरवाडी, लोकमान्य युवक मित्र मंडळ सोसायटी अजमेरा,
एफ टाईप बिल्डिंग भोसरी, मंगल विश्व सोसायटी रावेत, सेलेस्टिअल सिटी रावेत, साईराज रेसिडेन्सी नवी सांगवी, डीके एलिगन्स रावेत, साई स्नेह सांगवी

प्रभागस्तरीय विजेती मंडळे
अ ः शिवशक्ती आकुर्डी, आकुर्डीचा राजा शिवराज, भैरवनाथ आकुर्डी; ब ः आदर्श चिंचवड, मोरया ट्रस्ट चिंचवड, श्रीकृष्ण किवळे; क ः नवमहाराष्ट्र लांडेवाडी, सुवर्णयुग चॅरिटेबल ट्रस्ट इंद्रायणीनगर, श्रीराम भोसरी; ड ः भैरवनाथ पिंपळे गुरव, सेव्हन स्टार स्पोर्ट क्लब रहाटणी, श्रीगणेश पिंपळे निलख; ई ः श्री साईनाथ मोहननगर, दक्षता रुपीनगर, त्रिमूर्ती रामनगर; फ ः अमरदीप तरुण पिंपरी, जय महाराष्ट्र थेरगाव, शिवराय प्रतिष्ठान पिंपरी; ग ः जय बजरंग आहेरवाडी, जय हनुमान युवा प्रतिष्ठान दापोडी, न्यू संकल्प युवा प्रतिष्ठान थरमॅक्स चौक; ह ः शितोळेनगर क्रीडा मंडळ, शिवराय नवी सांगवी, आनंदनगर सांगवी.

जिवंत देखावा
समाधान तरुण मंडळ चिंचवड स्टेशन, यशस्वी मंडळ चिंचवड स्टेशन, खंडोबा माळ मंडळ आकुर्डी,
विनर्स मंडळ लांडेवाडी, अष्टविनायक भोसरी, खंडोबा मंडळ भोसरी, नरवीर तानाजी तरुण मंडळ भोसरी, एकता मंडळ रुपीनगर, नागेश्वर मंडळ आकुर्डी, वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल साने चौक, एकविरा सेवा संघ वाल्हेकरवाडी, जय गुरूदत्त मंडळ वाल्हेकरवाडी, सम्राट मंडळ थेरगाव, स्वराज्य प्रतिष्ठान पिंपरी, श्री छत्रपती शिवाजी मंडळ थेरगाव, जोतिबा कामगार कल्याण मंडळ काळेवाडी, अनंत पार्क थेरगाव, चिंतामणी चिंचवड, नवतरुण मंडळ चिंचवड, विशाल मंडळ थेरगाव.

स्थिर व हलता देखावा
प्रभाग अ ः तरुण आकुर्डी, अर्जुन आकुर्डी, नवयुग मंडळ मोरवाडी; ब ः अखिल मित्र मंडळ चिंचवड, बागेची तालीम मंडळ चिंचवड, बिजलीनगर युवा प्रतिष्ठान चिंचवड; क ः अष्टविनायक, श्री एकता मित्र मंडळ अजमेरा कॉलनी, नवज्योत भोसरी; ड ः जय महाराष्ट्र पिंपळे सौदागर, अनंत तरुण मंडळ पिंपळे गुरव, श्री शिवाजी मंडळ पिंपळे निलख, ई ः न्यू गोल्डन स्टार स्पोर्ट्स फाउंडेशन चिखली, रणझुंजार मोहननगर, विठ्ठलवाडी तरुण मंडळ आकुर्डी; ग ः पवना पिंपरी, डी फ्रेंड्स सर्कल पिंपरी, आझाद काळेवाडी; ह ः राही माई प्रतिष्ठान सांगवी, मधुबन सांगवी, चैत्रबन मंडळ नवी सांगवी; फ ः जाणता राजा ग्रुप कासारवाडी, नवनाथ कासारवाडी, नवरंग फुगेवाडी.

सामाजिक, वैज्ञानिक, पर्यावरणपूरक देखावे
प्रभाग अ ः श्रीकृष्ण क्रांती मंडळ आकुर्डी, हनुमान तरुण मंडळ आकुर्डी, आदर्श मंडळ आकुर्डी;
ब ः ज्ञानदीप चिंचवड, लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संकुल, शिवछत्रपती तरुण किवळे; क ः लोंढे तालीम भोसरी, गव्हाणे मंडळ भोसरी, जय महाराष्ट्र भोसरी; ड ः मोरया तिरंगा मंडळ काळेवाडी, संदेशभाऊ साठे पाटील प्रतिष्ठान पिंपळे निलख, अष्टविनायक प्रतिष्ठान पिंपळे गुरव; ई ः भैरवनाथ सेवा प्रतिष्ठान रुपीनगर, नवयुग रुपीनगर, क्रांतिज्योत रुपीनगर; ग ः ज्योती मंडळ पिंपरी, वनदेव मंडळ, लवकुश मंडळ थेरगाव; ह ः सीजन ग्रुप सोशल वेलफेअर ट्रस्ट सांगवी, नवी सांगवी विभागीय मित्र मंडळ, हिंदवी सोशल ट्रस्ट जुनी सांगवी; फ ः संतनगर मंडळ मोशी, सणसागर मंडळ थरमॅक्स चौक; स्वराज्य संत तुकारामनगर.

धार्मिक पौराणिक देखावे
प्रभाग अ ः शरयूनगर प्रतिष्ठान प्राधिकरण, स्वामी विवेकानंद आकुर्डी, श्री तुळजा माता मंडळ आकुर्डी; क ः भोजेश्वर मंडळ भोसरी, श्री गणेश भोसरी, लांडे ब्रदर्स अँड फ्रेंड सर्कल भोसरी; ई ः श्री हनुमान व्यायाम मंडळ टाळगाव चिखली, श्री संत सावता माळी तरुण मंडळ चिखली, सुभाष मित्र मंडळ जाधववाडी; ग ः सेवा विकास मंडळ संत तुकारामनगर, जय भवानी तरुण मंडळ मोहननगर, जय महाराष्ट्र व्यायाम मंडळ कासारवाडी.

रोषणाई देखावे
गणेश मंडळ तळवडे, ज्योतिबा तरुण मंडळ तळवडे, गणेश कामगार मंडळ विठ्ठलवाडी, भक्तीशक्ती तरुण मंडळ संत तुकारामनगर, महाराजा ग्रुप ट्रस्ट इंद्रायणीनगर, आझाद मंडळ पिंपरी, शिवाजी चौक पिंपळे निलख, समता मंडळ नवी सांगवी.

महोत्सवी मंडळे
उज्ज्वल मंडळ शिवराज्य ग्रुप पिंपरी, शिवाजी तरुण मंडळ सांगवी, मयूरेश मंडळ चिंचवड, सौंदर्य मंडळ पिंपरी, श्रीरामभक्त हनुमान मंडळ रुपीनगर, सिद्धिविनायक मंडळ आकुर्डी.
---

डीएसपी ब्लॅक, स्मिरनॉफसह अनेक ब्रँडना फटका! FSSAIच्या तपासणीत मोठा खुलासा; १८ हजार पेट्या जप्त, कारण काय?

Bhimashankar Temple : श्रावणापासून भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत दर्शनासाठी खुले

रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती! बाहेरचं खाणं किती सुरक्षित? धक्कादायक अहवाल समोर, जेवायला जाण्याआधी 'ही' बातमी वाचाच

"मला फरक पडत नाही तो १५ चा आहे की १८...", Vaibhav Sooryavanshi बद्दल ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली नेमकं काय म्हणाला?

Scholarship Exam Result : चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीचा अंतिम निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT