पिंपरी-चिंचवड

वृक्षारोपणासाठी ‘ग्रीन रीइमॅझिंड’ संकल्पना

CD

पिंपरी, ता. १४ : ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे ‘सकाळ माध्यम समूह’ आणि यशदा रिॲल्टी यांनी वृक्षारोपणाचा वसा घेतला आहे. गेल्या वर्षी लावलेली झाडे आता चांगलीच बहरली आहेत. आता त्याहीपेक्षा वेगळ्या पद्धतीने वृक्षारोपण आणि त्यांच्या संगोपनाचा संकल्प केला आहे. ही पद्धत म्हणजे ‘ग्रीन रीइमॅझिंड’ अर्थात हिरव्या गर्द वनराईची संकल्पना होय.

पर्यावरण संवर्धनासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि यशदा रिॲल्टी यांनी वृक्षारोपण संकल्पना मांडली आहे. या अंतर्गत वृक्षांची मैत्री करण्याचे आवाहन करीत निगडी ते देहूरोड परिसरात विविध देशी वृक्षांची रोपे लावली होती. ती आता चांगलीच बहरली आहेत. यावर्षी पुनावळे परिसरात वन विभागाच्या जागेत वृक्षारोपण केले जाणार आहे. तिथे घनदाट वनराई निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे तीन वर्षे संगोपन केले जाणार आहे. त्यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था केली जाणार आहे. या उपक्रमात सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा, वृक्षप्रेमींचा, पर्यावरणप्रेमींचा, बालकांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या सर्वांचाच सहभाग अपेक्षित आहे, तोही कुटुंबातील सर्व सदस्यांसह...
त्यामुळे सज्ज होऊया आणि वृक्षारोपण करूया! आपल्या कुटुंबाची आठवण म्हणून आणि निसर्गाप्रती कर्तव्य म्हणून एक तरी झाड यावर्षी लावूया!

‘ग्रीन रीइमॅझिंड’ संकल्पना
‘ग्रीन रीइमॅझिंड’ (Green reimagined) संकल्पनेवर आधारित वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. ‘ग्रीन रीइमॅझिंड’ म्हणजे ‘हिरवाईची पुनर्कल्पना’ किंवा ‘नव्या रूपात हिरवाई अर्थात वनराई’ उभारणे. या अंतर्गत वृक्षारोपणाच्या परंपरागत पद्धतीपेक्षा काहीतरी वेगळ्या, आधुनिक आणि आकर्षक पद्धतीने रोपे लावली जाणार आहेत. निसर्ग वाचवण्याच्या जुन्या संकल्पनांना आधुनिक तंत्रज्ञानासह नव्या स्वरूपात जोडण्याचा उद्देश या उपक्रमाचा आहे.

नव्या पर्वाचा भाग होऊया!
गेल्या वर्षी साधारण दोन हजार रोपांची लागवड निगडी ते देहूरोडदरम्यान केली होती. त्यात अनेक कुटुंबांनी सहभाग घेतला होता. वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब अशी रोपे लावली होती. आता पुनावळेत वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यातही कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन ‘सकाळ माध्यम समूह’ आणि यशदा रिॲल्टी यांनी केले आहे. त्यासाठी ‘ग्रीन रीइमॅझिंड’ या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. झाडे लावण्याबरोबरच त्यांचे पालकत्व स्वीकारण्याची संकल्पना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT