पिंपरी, ता. १४ : ‘‘अध्यात्म आणि सेवा यांचा संगम करीत, तरुणांना एकत्र करून सामाजिक कार्य करण्याचे काम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने केले आहे. उत्सवाचा कार्यकर्ता हा नेता, सामाजिक कार्यकर्ता किंवा उत्तम व्यावसायिक होतो. उत्सवाच्या माध्यमातून कार्यकर्ता सर्वगुणसंपन्न होतो’’, असे मत पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ, पुणे यांच्या वतीने आयोजित गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस समारंभात लांडगे बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात गुुरुवारी (ता. १३ ) हा कार्यक्रम पार पडला. चिंचवड देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त मंदार महाराज देव, उपमहापौर शर्मिला बाबर, आमदार अमित गोरखे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने कार्यकर्ते व परीक्षक मंडळ उपस्थित होते. स्पर्धेमध्ये शहरातील २२५ गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १८७ मंडळांना १४ लाख २० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
आमदार गोरखे म्हणाले, ‘‘डीजे प्रथाही अनेक ठिकाणी आहे. त्याचा पायंडा आपण कमी केला पाहिजे. उद्याची चांगली पिढी घडविताना कार्यकर्तादेखील घडला पाहिजे.’’ आमदार हेमंत रासने म्हणाले, ‘‘पिंपरी चिंचवडमधील स्पर्धेत यंदा सुमारे ३०० मंडळ सहभागी झाली. ही विधायक शक्ती समाजातील अनेक कामे करत आहे.’’ ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.