पिंपरी : सोलार सिस्टीम बसवून देतो, असे सांगून एकाची चार लाख ९२ हजारांची फसवणूक केली. तसेच त्याबाबत विचारणा केली असता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हा प्रकार चिखलीतील शेलारवस्ती येथे घडला. या प्रकरणी सुनील गुलाब शेलार (रा. शेलारवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र महादेव बोराडे (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने तो एपीएम सोलार प्रा. लि. कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे खोटे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीच्या घरी सोलार बसविण्यासाठी त्यांच्याकडून चार लाख ९२ हजार रुपये घेतले. त्यानंतर सोलार सिस्टीम बसविली नाही अथवा पैसेही परत दिले नाहीत. त्याबाबत त्यास विचारणा केली असता ‘‘तुला काय करायचे ते कर, मी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार समितीचा सदस्य आहे. तू मला त्रास दिल्यास मी तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीन,’’ अशी धमकी दिली.
पत्नीला बिअरच्या बाटलीने मारहाण
पिंपरी : पत्नीला शिवीगाळ करीत बिअरच्या बाटलीने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना थेरगाव येथे घडली. या प्रकरणी नीलेश दत्तू काळुंके (रा. थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धनंजय कांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांची बहीण शुभांगी कांबळे हिला तिचा पती धनंजय याने दमदाटी करीत बिअरच्या बाटलीने मारहाण करून गंभीर जखमी केले.
जावयाकडून सासूला बेदम मारहाण
पिंपरी : सासूला काचेच्या बाटलीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी जावयावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भोसरी एमआयडीसीतील बालाजीनगर येथे घडली. या प्रकरणी ४५ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शाहरुख शेख, चप्या या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांची मुलगी बालाजीनगर येथील जावयाच्या घरी गेले. तू आमच्या घरी येऊन आम्हाला व मुलीला त्रास देवू नकोस, मुलीला तुझ्याकडे पाठविणार नाही, असे फिर्यादीने सांगितले. त्यावर आरोपी शाहरुख याने फिर्यादीला शिवीगाळ करीत काचेची बाटली त्यांच्या तोंडावर व डोक्यात मारली. यामध्ये त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. तसेच शाहरुखच्या भावानेही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
दिघीत तरुणावर चाकूने वार
पिंपरी : जुन्या वादाच्या रागातून तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना दिघीतील समर्थनगर येथे घडली. या प्रकरणी रणजित ईश्वर शिंदे (रा. यमाईनगर, दिघी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्री उर्फ शेरा रंधवा (रा. दिघी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी व सिमेंटच्या गट्टूने फिर्यादीला मारहाण केली. तसेच चाकूने पोटावर, तोंडावर वार करून जखमी केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.