पिंपरी-चिंचवड

चिंचवडमध्ये तिघांवर कोयत्याने वार

CD

पिंपरी : रागाने बघितल्याच्या कारणावरून तिघांवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना चिंचवडमधील दत्तनगर येथे घडली. या प्रकरणी बसवराज यल्लपा हेळवार (रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंद कांबळे, अर्जुन पात्रे (दोघेही रा. विद्यानगर, चिंचवड) आणि आशिष गवारी (रा. वाल्हेकरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांचा भाऊ संगमेश आणि मित्र ऋषिकेश यांच्यासोबत दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवले. ‘माझ्याकडे रागाने का बघतोस’ असे म्हणत आशिष गवारी याने कोयत्याने फिर्यादीच्या गाडीचे नुकसान केले. आनंद कांबळे याने फिर्यादीच्या हातावर आणि पायावर वार केले, तर अर्जुन पात्रे याने संगमेश याच्या हातावर कोयत्याने वार केले. तिसरा आरोपी आशिष याने मित्र ऋषिकेश याच्या पाठीवर, छातीवर आणि मांडीवर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले.

खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव खासगी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना काळेवाडी फाटा ते कस्पटे वस्ती रस्त्यावर घडली. अविनाश सुरेश गायकवाड (वय २५) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एका महिला फिर्यादीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (ता. १८) बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अविनाश हे शनिवारी (ता. १७) काळेवाडी फाटा ते कस्पटे वस्ती या रस्त्याने दुचाकीवरून जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील बस बेदरकारपणे चालवून अविनाश यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात अविनाश यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दापोडीत ४४ हजारांचा गुटखा जप्त; एकाला अटक
पिंपरी : शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दापोडीतील टिंगरे चाळ परिसरात करण्यात आली. रुपेश राजेंद्र देवाडीगा (रा. टिंगरे चाळ, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने आपल्या घरासमोर मोकळ्या जागेत गुटखा आणि सुगंधित सुपारी साठवून ठेवली होती.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seized Vehicles: पोलीस ठाणे, पोलीस यार्ड आणि रस्त्यांवरील जप्त वाहनांचा ढिगारा हटवा; राज्य सरकारचा मोठा आदेश, डेडलाईन काय?

बॉलिवूडने नाकारलं, बिझनेसने तारलं! विवेक ओबेरॉय कसा बनला कोट्यवधींचा मालक? नेमके कुठे गुंतवले पैसे? स्वतः सांगितला प्लॅन

TMC Election: ठाणे महापालिकेत ‘ती’चा आवाज! ६९ रणरागिणींनी लुटले विजयाचे वाण; शिवसेनेच्या सर्वाधिक ४० नगरसेविका

Pune Doctor Kidnapping : डॉक्टर अपहरण आणि खंडणी प्रकरणातील चार आरोपींना अटक; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Latest Marathi News Live Update : नोएडाचे सीईओ आणि नोएडा मेट्रो कॉर्पोरेशनचे एमडी यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले

SCROLL FOR NEXT