पिंपरी-चिंचवड

काही माजींना नाकारले; काहींना स्वीकारले

CD

पिंपरी, ता. १९ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची खात्री मानल्या जाणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या अनेक माजी नगरसेवकांना मतदारांनी धक्का दिला. काहींना मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला, तर काहींचा अवघ्या काही मतांनी निसटता पराभव झाला. पक्षांतर केलेल्या काही माजी नगरसेवकांनी प्रतिस्पर्धी पक्षातील माजी नगरसेवकांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला असला, तरी कायम जनसंपर्कात राहणाऱ्या काही माजी नगरसेवकांनाच मतदारांनी स्पष्ट कौल दिला. मात्र, बहुतांश ठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या नवख्या उमेदवारांनी अनुभवी माजी नगरसेवकांना पराभूत केले.
महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांत माजी नगरसेवकांना पराभव स्वीकारावा लागला. काही माजी नगरसेवकांनी पक्ष न बदलता त्याच पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि अशा उमेदवारांना मतदारांनी चांगल्या मताधिक्याने निवडून दिले. मात्र, पक्षाची उमेदवारी मिळण्याबाबत अनिश्चितता असल्याने पक्षांतर केलेल्या अनेक माजी नगरसेवकांना मतदारांनी थेट नाकारले, हे निकालातून स्पष्ट झाले. तब्बल तीन वेळा निवडून आलेल्या काही माजी नगरसेवकांनाही या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. तर, २०१७ च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक माजी नगरसेवकांना मतदारांनी पुन्हा संधी देत चांगल्या मतांनी निवडून दिले. काही प्रभागांत एकाच प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या पती-पत्नींना मतदारांनी नाकारले, तर काही ठिकाणी पती निवडून आले आणि पत्नीला मतदारांनी पराभूत केले.

पराभूत माजी नगरसेवक
प्रभाग २ ः भाजपच्या सुजाता बोराटे यांच्याकडून राष्ट्रवादीच्या अश्विनी जाधव ३,२७४ मतांनी पराभूत
प्रभाग ४ ः राष्ट्रवादीचे चंद्रकांत वाळके यांचा तब्बल १०,२८८ मतांनी पराभव
प्रभाग १४ ः भाजपचे प्रसाद शेट्टी यांचा राष्ट्रवादीचे प्रमोद कुटे यांच्याकडून ५,८४६ मतांनी पराभव
प्रभाग १६ ः राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचा ४,७२४ मतांनी आणि त्यांच्या पत्नी जयश्री यांचा ५,१२१ मतांनी पराभव, तर राष्ट्रवादीच्या बंडखोर अपक्ष माजी नगरसेवक प्रज्ञा खानोलकर यांना अवघी ८७३ मते मिळाली.
प्रभाग १८ ः राष्ट्रवादीच्या अश्विनी चिंचवडे यांचा ४,३४३ मतांनी पराभव
प्रभाग २० ः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुलक्षणा धर यांचा राष्ट्रवादीचे जितेंद्र ननावरे यांच्याकडून ३,६२३ मतांनी पराभव
प्रभाग २१ ः राष्ट्रवादीच्या माजी तथा भाजपच्या उमेदवार उषा वाघेरे यांचा ३,४६५ मतांनी पराभव
प्रभाग २५ ः भाजपच्या रेश्मा भुजबळ यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादीच्या उमेदवार रेखा दर्शले यांचा १४,६०१ मतांनी, तर भाजपचे राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मयूर कलाटे यांचा १४,८९६ मतांनी पराभव केला
प्रभाग २६ ः भाजपचे संदीप कस्पटे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांचा ९,२६९ मतांनी पराभव केला

विजयी माजी नगरसेवकांचे मताधिक्य
प्रभाग ९ ः राष्ट्रवादीचे राहुल भोसले ७,२५४
प्रभाग ३ ः भाजपचे नितीन काळजे १९,६२०
प्रभाग ४ ः भाजपच्या हिराबाई घुले १२,९७१
प्रभाग ८ ः भाजपच्या नम्रता लोंढे ७,७१०
प्रभाग १० ः भाजपच्या अनुराधा गोरखे ६,०३७
प्रभाग १५ ः भाजपच्या शैलजा मोरे १२,८२३; शर्मिला बाबर ५,९४९ आणि अमित गावडे ६,८९०
प्रभाग १८ ः भाजपच्या अपर्णा डोके ९,५४३
प्रभाग २० ः राष्ट्रवादीचे योगेश बहल ९,१८५
प्रभाग २१ ः राष्ट्रवादीचे संदीप वाघेरे १६,४३०, डब्बू आसवानी १२,१३९
प्रभाग २२ ः भाजपच्या नीता पाडाळे ७,७३३
प्रभाग २४ ः शिवसेनेचे नीलेश बारणे ७,९९०
प्रभाग २५ ः भाजपचे राहुल कलाटे १४,८९६

प्रभाग २६ ः भाजपचे विनायक गायकवाड १२,७८४; आरती चोंधे ५,८६० आणि संदीप कस्पटे ९,२७९
प्रभाग २८ ः भाजपचे शत्रुघ्न काटे ७,३३६; राष्ट्रवादीचे नाना काटे ६,२८१
प्रभाग २९ ः भाजपच्या शकुंतला धराडे ६,२३२
प्रभाग ३१ ः भाजपचे नवनाथ जगताप १०,२३४

हेही नसे थोडके
- २१ ते ३ हजार मतांनी पराभूत माजी नगरसेवक ः २९
- २१ ते ६ हजार मतांनी निवडून आलेले नगरसेवक ः ३४
- निवडून आलेले माजी महापौर ः ६
- पराभूत झालेले माजी महापौर ः १
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka DGP's Misconduct : महिलेसोबत ‘डीजीपी’चे असभ्य वर्तन!, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी व्यक्त केला संताप

IND vs NZ, ODI: 'मी नाव घेणार नाही, पण...' गावसकरांनी सांगितले न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार?

Bajaj Pune Grand Tour Traffic Update : 'बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2'साठी २१ जानेवारीला पुण्यातील वाहतुकीत बदल!

Team India Under Gambhir: 'अजिंक्य' टीम इंडियाची घरच्या मैदानावर वाताहत; कोच गौतम गंभीरचे रिपोर्ट कार्ड पाहून बसेल धक्का!

Ambegaon Political : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का; माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश!

SCROLL FOR NEXT