पिंपरी-चिंचवड

स्पर्धा मार्ग चकाचक; समांतर रस्ते ‘जैसे-थे’

CD

पिंपरी, ता. २० ः गेल्या महिन्यापासून पिंपरी चिंचवड शहरातील भिंतीची रंगरंगोटी आणि रस्ते चकाचक करण्याचे काम सुरू होते. ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची ही तयारी होती. स्पर्धा मार्गावरील पदपथावर वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणून ठेवली आहेत. स्पर्धा मार्ग, तसेच जोडणारे उपरस्त्यावरील अतिक्रमण हटविले आहेत. आंतरराष्ट्रीय मानकानुसार गतिरोधक केले आहेत. त्यांवर पांढरे पट्टे मारले आहेत. मात्र, अशा रस्त्यांना समांतर वा पूरक रस्त्यांची स्थिती ‘जैसे-थे’ आहे. खोदलेले रस्ते, खड्डे, कडेला कचरा असेच चित्र आहे. काही ठिकाणी पडदा लावून हे सर्व प्रकार लपविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला आहे.
शहरातील असो की लगतच्या ग्रामीण भागातील सामान्य नागरिक दररोज ‘ट्रॅफिक’ मधून जातो. धुळ व खड्डेमय रस्त्यांनी प्रवास करतो. सध्याही अशीच स्थिती आहे. मात्र, पुणे ग्रॅंड टूरसाठी नियोजित रस्ते मात्र चकाचक केले आहेत. पायाभूत सुविधा आणि रस्त्यांच्या विकासाला ‘सुपरफास्ट स्पीड’ देऊन गेल्या महिन्याभरात स्पर्धा मार्गातील रस्त्यांचा कायापालट झाला आहे. त्याच स्पर्धा मार्गावरील दुसऱ्या बाजूला कचरा साचलेला आहे. मार्गावरील झोपडपट्टीधारकांची घरांना कापड लावून ‘गरिबी’ झाकली आहे. एका बाजूची रंगरंगोटी केली, दुसऱ्या बाजूची केली नाही, असे विसंगत चित्र दिसून येत आहे.

सायकल स्पर्धा टप्पा १
पुणे सायकल ग्रँड टूर स्पर्धेसाठी टीसीएस सर्कल हिंजवडी फेज ३ प्रारंभ- श्री बापूजी बुवा मंदिर माण मुळशी- शेळकेवाडी फाटा- हनुमान चौक- भरे पूल- अंबडवेट कमान- पौड- चाले- नांदगाव- कोळवण- हाडशी तलाव- जवण- तिकोना पेठ- काले- कडधे- थूगाव- शिवणे- डोणे- सावळे चौक- आढळे- चंदनवाडी- चांदखेड- कासारसाई- नेरे- मारुंजी- लक्ष्मी चौक- भूमकर चौक- डांगे चौक- संत नामदेव महाराज चौक- डी. वाय. पाटील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आकुर्डी असा पहिल्या टप्प्यात मंगळवारी (ता. २०) झालेल्या सायकल स्पर्धेचा मार्ग होता. त्याची शहरातील रस्त्यांवर जय्यत तयारी सुरू होती. रस्ते चकाचक केले होते. स्पर्धेच्या मार्गाव्यतिरिक्त रस्त्यांची स्थिती ‘जैसे-थे’ दिसून आली.

ना सफेद पट्टे, ना साफसफाई
निगडीतील भक्तीशक्ती चौकाकडून त्रिवेणीनगर चौकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून या स्पर्धेतील सायकल धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील रस्त्यावर सफेद पट्टे आखण्यासह साफसफाई व रस्त्यालगत रंगरंगोटीही केली आहे. स्पर्धेनिमित्त हा रस्ता सुंदर बनविला आहे. मात्र, या उलट परिस्थिती त्रिवेणीनगर चौकाकडून भक्तीशक्ती चौकाकडे येणाऱ्या समांतर मार्गाची आहे. या रस्त्यावर ना सफेद पट्टे, ना साफसफाई अशी स्थिती आढळून आली.

भूमकर चौकामध्ये दररोज वाहतूक कोंडी असते, तेव्हा पोलिस व वॉर्डनची संख्या दोन अथवा तीन असते. पण, मंगळवारी सुमारे १५ पोलिस थांबले होते. अशीच व्यवस्था दररोज ठेवली तर वाहतूक कोंडी होणार नाही.
- सम्मेद गिरवल, विद्यार्थी, ताथवडे

बजाज ग्रँड टूर स्पर्धा मार्गावरील रस्ते चकाचक केले आहेत. तरी विसंगत चित्र कुठे कुठे आहे, याबाबतची माहिती घेऊन सांगतो. कारण, संबंधित विषय माझ्याकडे नाही.
- विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Tax New Rules : आता 'या' वाहनांना 'फिटनेस सर्टिफिकेट' अन् 'एनओसी'ही मिळणार नाही!

Pune Cycle Race: पुण्यातल्या सायकल स्पर्धेबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय; स्पर्धकांच्या दिमतीला दोन विशेष पथके

Pune Water Crisis : पुण्यातील पाणीपुरवठा संकट; दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका, महापालिकेची तातडीची उपाययोजना

Akola News : ८ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; हरवलेला लेक सापडला, वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

U19 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला! १२ चौकार अन् ५ षटकारांसह झळकावलं विश्वविक्रमी शतक

SCROLL FOR NEXT