पिंपरी-चिंचवड

सोमाटणेत पुष्पवृष्टी

CD

सोमाटणे ः आढले, चांदखेड, कासारसाई येथे अनेक ठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. याशिवाय जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यार्थी, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, महिला बचत गट, पोलिस मित्र संघटनांचे सदस्य स्पर्धकांची प्रतिक्षा करीत होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्पर्धकांचे आढले येथे आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच मछिंद्र
म्हस्के यांनी औपचारिक स्वागत केले. अनेकांनी तिरंगा हातात घेऊन स्पर्धकांना सलामी दिली. पावणे चार वाजण्याच्या सुमारास स्पर्धकांचे आगमन चांदखेड येथे झाले. तेथे सरपंच मीना माळी यांच्या नियोजनाखाली शालेय विद्यार्थ्यांनी ढोल, ताशा, लेझीमच्या गजरात स्वागत केले. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांनी मावळी वेशभूषा, तर जिल्हा परिषेद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांची वेशभूषा केली होती. कासारसाई येथे सरपंच प्रियांका गायकवाड यांच्या नियोजनाखाली देशभक्तिपर गीतांनी स्वागत करण्यात आले.
---

फोटो
88246

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT