पिंपरी-चिंचवड

सायकल स्‍पर्धेच्‍या मार्गावरील शाळा उद्या दुपारी बंद

CD

पिंपरी, ता. २१ : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा चौथा टप्पा २३ जानेवारीला (शुक्रवार) होत आहे. यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत स्पर्धा मार्गावरील सर्व सरकारी व खासगी शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरू ठेवाव्यात. त्यांनतर शाळा बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

स्पर्धेच्या टप्पा क्रमांक चार अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम, बालेवाडी येथून स्पर्धेला सुरुवात होणार असून, ती पुणे शहर हद्दीत जावून परत राजीव गांधी उड्डाणपूलमार्गे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणार आहे. तेथून ती सांगवी, वाकड, निगडी, त्रिवेणीनगर, भोसरी, चिखली, पिंपरी, काळेवाडी परिसरातून फिरुन परत राजीव गांधी उड्डाणपूलमार्गे पुणे शहर हद्दीत प्रवेश करणार आहे. ही स्पर्धा सुरळीत व सुरक्षितपणे व्‍हावी, यासाठी तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्याकसाठी स्पर्धा मार्गावरील सांगवी, वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे, निगडी प्राधिकरण, इंद्रायणीनगर, चिंचवड एमआयडीसी, चिखली, काळेवाडी, भोसरी एमआयडीसी, यशवंतनगर पिपरी, त्रिवेणीनगर या परिसरांतील सर्व शासकीय व खासगी शाळा दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: नेदरलँड्सला 'गुजरात'च्या कर्णधाराची मदत! भारताची कोंडी केली; शिवम-हार्दिक जोडी संकटमोचक ठरली

School Bus Strike: परीक्षांच्या तोंडावर स्कूल बस संघटनेचा संपाचा इशारा!'या' दिवशी राज्यभर सेवा ठप्प ठेवणार, मागण्या काय?

Ajit Pawar Plane Crash: ''दादाच राहिला नाही, आता खरं-खोटं करून काय उपयोग?'' सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Teacher News: महत्त्वाची बातमी! शाळेतील शिक्षकांना नियमित करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, वेतनश्रेणीला मंजुरी

Latest Marathi News Live Update : मुलुंड मेट्रो बांधकाम दुर्घटनेत पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT