पिंपरी-चिंचवड

गुन्‍हे वृत्‍त

CD

चिंबळीत कंत्राटदारावर चाकूने हल्‍ला
पिंपरी : चिंबळी येथे सुरू असलेले ग्रामपंचायतीच्या सांडपाणी वाहिनीचे काम दोन जणांनी चाकूचा धाक दाखवून बंद पाडले. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या कंत्राटदारावर चाकूने वार करून त्यास जखमी केले. ही घटना चिंबळी येथील बर्गे वस्ती भागात घडली. याबाबत स्वप्नील लोखंडे (वय-३२, बर्गे वस्ती, चिंबळी) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूर्यकांत कटिंग आणि सुजित बोराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टेम्पोच्‍या धडकेत दोन दुचाकीस्‍वार जखमी
पिंपरी : बावधन येथील सातारा-मुंबई हायवे सेवा रस्त्यावर एका टेम्पो चालकाने दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले. मिरावली महाजन (वय. ३३), फिरोज महाजन (वय. ३१, रा. दोघेही बावधन खुर्द) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी फिरोज यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक
पिंपरी : खेड तालुक्यातील निघोजे गावच्या हद्दीत पोलिसांनी एका तरुणाला देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी अटक केली. जव्हारसिंग केबट (वय-२८, भांबोली, मूळ - मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल राजेश गिरी यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


मटका जुगारावर छापा
पिंपरी : कुरुळी येथील चिंबळी फाटा परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांविरुद्ध कारवाई केली. या प्रकरणी माणिक कचरे (वय ५३, भोसरी), रमेश चडार (वय ५१, भोसरी), संजय साळुंके (वय ६७, वडमुखवाडी), अनिल शिंदे (वय ३०, भोसरी) आणि रफिक काझी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दारू भट्टीवर कारवाई
पिंपरी : मावळातील आंबी गाव परिसरात पोलिसांनी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून रसायने जप्त केली. निलम राठोड (वय ३३) आणि जीना राठोड (वय ४५, रा. दोघेही राठोड वस्ती, आंबी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एका कारवाईत शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मामुर्डी येथे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई करत एक लाख ४५ हजार रुपये किमतीचे दोन हजार ९०० लिटर रसायन नष्ट केले. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिला फरार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT