पिंपरी, ता. २१ : पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या निमित्ताने महावितरण शुक्रवारी (ता. २३) देखभाल दुरुस्तीची कामे करणार आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. २२) वीज पुरवठा नियमित सुरू ठेवण्यात येईल. या कारणामुळे औद्योगिक परिसरातील अनेक कंपन्या गुरुवारी ऐवजी शुक्रवारी बंद ठेवण्यात येतील, अशी माहिती पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेतर्फे देण्यात आली. सायकल शर्यत सुरक्षित, सुरळीत व विना अडथळा व्हावी म्हणून स्पर्धेच्या मार्गावर इतर सर्व प्रकारच्या वाहतुकीला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. वाहतुकीचा ताण कमी करणे आवश्यक असल्याने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे आणि महावितरणच्या भोसरी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला. एरवी गुरुवारी (ता. २२) देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी लोडशेडिंगची कामे शुक्रवारी (ता. २३) करण्याचा आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आला आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.