पिंपरी, ता. २२ ः स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत महापालिका आरोग्य विभागाने विशेष जनजागृती कार्यक्रम चिंचवड येथील जिजाऊ पर्यटन केंद्रात घेतला. कचऱ्याचा कमी वापर, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण या तत्त्वांवर आधारित आरआरआर सेंटर संकल्पनेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कचरा निर्मिती कमी करण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणत्या सवयी अंगीकाराव्यात, वापरलेल्या वस्तूंचा पुनर्वापर कसा करता येईल, पर्यावरण संरक्षणात प्रत्येक नागरिकाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबत मार्गदर्शन केले. ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाच्या डब्याचा व सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाच्या डब्याचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दाखवले. कचरा रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी न टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळणे, सार्वजनिक शौचालयांचा योग्य वापर करणे, ‘फ्लश करा, हात स्वच्छ ठेवा’ या स्वच्छतेच्या सवयींबाबत जनजागृती केली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.