श्रीकृष्ण सोसायटीसमोर कचऱ्याचे ढीग
पिंपरीगावात येथील श्रीकृष्ण सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत काही नागरिक सतत कचरा टाकत आहेत. तसेच झाडाच्या फांद्या देखील तेथेच टाकल्या जात आहेत. परिणामी येथे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. उंदीर व कुत्रे हा कचरा इतरत्र पसरवत आहेत. त्यामुळे परिसर अस्वच्छ झाला असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाने येथील कचरा उचलून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी.
- शरद पाचणकर, पिंपरीगाव
88977
रावेतमध्ये मध्यरात्रीही बांधकाम जोरात
औंध रावेत बीआरटीएस मार्गावर रावेत येथे अर्बन स्कायलाईन फेज दोन चे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाचा दिवसभर तर आवाज येतोच. पण, मध्यरात्री उशिरापर्यंत देखील बांधकाम सुरु असते. या कर्णकर्कश आवाजामुळे दररोज लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांची निद्राभंग होते. याबाबत महापालिकेच्या ‘सारथी ॲप’वर तक्रार केली. परंतु, प्रशासन कोणतीही कार्यवाही न करता आठ ते दहा दिवसांनी ती तक्रार बंद करते. तक्रारीची दखल घेतल्याचा संदेश येतो. पण, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नसते. प्रशासन या तक्रारीची दखल घेत कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
- एक वाचक
88978
मुकाई चौकातील पदपथावर अतिक्रमण
मस्के वस्तीकडून मुकाई चौकाकडे जाताना अतिक्रमणामुळे नागरिकांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक राहिले नाहीत. तर काही ठिकाणी पदपथावर वाहनचालक वाहने उभी करतात त्यामुळे नागरिकांना चालताना अडचण होते. काही ठिकाणी तर पदपथावर काही लोक झोपलेले असतात. त्यामुळे पदपथाचा वापर करणे कठीण होत आहे.
- राकेश पवार, रावेत
88979
पथविक्रेते रस्त्यावरच पाणी टाकतात
यमुनानगर निगडी येथील छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा चौक रत्ना रुग्णालयाजवळ खाऊ गल्ली आहे. या खाऊ गल्लीत विविध खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. ही दुकाने रात्री बंद करताना अनेक विक्रेते रस्त्यावरच पाणी ओतून जातात. त्यामुळे रस्त्यावर चिखल होतो. बऱ्याच वेळा वाहने घसरून पडत असल्यामुळे चालकाला दुखापत होते. पालिकेच्या संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या विक्रेत्यांवर कारवाई करावी.
- संदीप पाटील, निगडी
88980
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.