पिंपरी, ता. २३ : आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा शुक्रवारी (ता. २३) उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरातून पार पडला. या टप्प्यात जागतिक दर्जाचे सायकलपटू वाऱ्याच्या वेगात शहरातील प्रमुख मार्गांवरून धावले. सायकलपटूंचा वाऱ्याचा वेग आणि त्यांची ऊर्जा सर्वांनाच प्रभावी करून गेली.
स्पर्धेदरम्यान पिंपरी चिंचवड आयुक्त बंगल्यासमोर काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. केएसबी चौकाकडून एम्पायर इस्टेटच्या दिशेने सायकलपटूंनी झपाट्याने आगेकूच केली. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात सायकलपटूंचे स्वागत केले. अनेक ठिकाणी नागरिकांनी मोबाइलमध्ये क्षण टिपत या ऐतिहासिक स्पर्धेचा साक्षीदार होण्याचा आनंद घेतला. ही स्पर्धा रक्षक चौकातून पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली. त्यानंतर काळेवाडी चौक, डांगे चौक, संत तुकाराम महाराज उड्डाणपूल, स्वामी विवेकानंद चौक, भक्ती शक्ती चौक, त्रिवेणीनगर, केएसबी चौक, टाटा सर्कल, इंद्रायणी चौक, प्राधिकरण परिसर, स्पाइन रोड, सिल्व्हर वस्तीमार्गे पुन्हा केएसबी चौक, एम्पायर इस्टेट उड्डाणपूल, तापकीर चौक, काळेवाडी आणि पुन्हा रक्षक चौकाकडून ही स्पर्धा पुणे शहराच्या दिशेने रवाना झाली.
या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या उत्साहात सायकलपटूंचे स्वागत केले. यात लहान मुलेही सहभागी होऊन खेळाडूंना प्रोत्साहन देत होती. शहरातील वाहतूक व्यवस्था आणि पोलिस प्रशासनाच्या नियोजनामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.