पिंपरी-चिंचवड

उद्योगनगरी ‘सायकल’स्वार

CD

पिंपरी, ता.२३ : ‘पुणे ग्रँड टूर-२०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेतील स्पर्धक उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात दाखल होताच नागरिकांनी उत्स्फूर्त आणि अमाप उत्साहात स्वागत करत एकच जल्लोष केला. शहरासह उपनगरांत प्रमुख रस्त्यांवर उत्स्फूर्तपणे उपस्थित राहत नागरिकांनी टाळ्या आणि जयघोषात खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यामुळे संपूर्ण शहर ‘सायकल’च्या वातावरणावर स्वार झाल्याचे दिसून आले.
निगडी परिसरात सायकलपटूंना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली होती. हातात तिरंगा ध्वज आणि स्वागताचे फलक घेऊन नागरिकांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ‘‘हिप हिप हुर्रै’’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भोसरी परिसरातही नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात सायकलपटूंचे स्वागत केले. काळेवाडी, १६ नंबर परिसर, डांगे चौक आणि ताथवडे भागातही सायकलपटूंचे स्वागत पाहायला मिळाले. लहान मुलांसह युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी रस्त्याकडेला उभे होते. सांगवी परिसर तसेच सांगवी फाटा भागात विशेष उत्साहाचे चित्र दिसून आले. घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि नागरिकांच्या गर्दीमुळे संपूर्ण परिसर उत्सवात न्हाल्यासारखा वाटत होता. ‘‘या स्पर्धेमुळे पिंपरी चिंचवड शहरात क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली असून, नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेचे यश अधोरेखित करणारा ठरला,’’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: भाजप सत्तेसाठी वापरतो अन्‌ फेकून देतो: सुषमा अंधारे, ​पेन ड्राईव्ह तयार आहेत म्हणत भाजपला डिवचले!

Road Accident : सर्वाधिक रस्ते अपघात मुंबईत; महामार्ग पोलिसांचा अहवाल

Ashoka Chakra : शुभांशू शुक्ला यांना ‘अशोक चक्र’

पुणे पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर, स्वत:ची चूक झाकण्यासाठी निरपराधाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं; हायकोर्टानं फटकारलं

कराड तालुका हादरला! चाकूच्या धाकाने युवतीवर अत्याचार;संशयिताकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलची धमकी, चौघांवर गुन्हा..

SCROLL FOR NEXT