घुसमट कधी थांबणार ?
चिखली कुदळवाडी भागातील अनेक भंगाराची दुकाने वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांमुळे हलवली गेली. मात्र अजूनही या भागातील दुकानांना आग लागते व आजूबाजूच्या परिसरातील सोसायटी धारकांना या वातावरणाचा त्रास सहन करावा लागतो. मोशी चाकण रस्त्यावर असलेल्या भंगाराच्या दुकानातील आगीने पूर्ण परिसर होरपळून गेला. शेकोटी पेटवली तरी दंड आकारणाऱ्या पालिकेने याच्या विरुद्धही कठोर कारवाई करावी.
-सुनील ढोबे, मोशी
PNE26V89318
पाणी गळती थांबवावी
आदित्य बिर्ला हॉस्पिटल कडून चिंचवडला पुलावरून जात असताना, या पुलाच्या कोपऱ्यावर पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइन दिसतात. यामधील वाहिन्या नादुरूस्त असल्याने येथे भरपूर पाणी गळती होते. संबंधित विभागाने याची दखल घेऊन त्वरित पाइपलाइन दुरुस्त करावी.
- राजेश डावरे, चिंचवड
PNE26V89320
बीआरटी मार्गावर धोकादायक खांब
चऱ्होलीतील वडमुखवाडी येथील अलंकापुरम चौकात बीआरटी मार्गाच्या सुरवातीलाच खासगी वाहनांना प्रवेश निषिद्ध अशी सूचना देणारा खांब आहे. हा खांब वाहनाच्या अपघातामुळे मागील अनेक दिवसांपासून डावीकडे वाकला गेला आहे. त्यावर असणारे लोखंडी सूचनाफलक डावीकडे रस्त्यावर आले आहे. त्यामुळे उजव्या बाजूने जाणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या सूचना दर्शक खांबाची दुरुस्ती करण्यात करावी.
- यशवंत वाघ, चऱ्होली बुद्रूक
PNE26V89319
पदपथ नक्की कशासाठी
चिंचवड स्टेशन येथील लक्ष्मी कॉर्नर समोर नवीन पदपथ तयार करण्यात आले आहे. मात्र, हे पदपथ नक्की नागरिकांसाठी चालण्यासाठी आहेत की वाहने पार्किंगसाठी हेच समजत नाही. पदपथ आणि सायकल ट्रॅक वर सर्रास दुचाकी उभ्या केल्या जातात. यामुळे नागरिकांना चालण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. तसेच येथील दुकानांचे फलक देखील पदपथावरच लावलेले असतात त्यामुळे अधिकच भर पडते.
- उदय नवले, चिंचवड स्टेशन
PNE26V89317
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.