पिंपरी, ता. २४ : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर करण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यासंदर्भात बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या असून, त्यानुसार लेखा व वित्त विभागाने सर्व विभागांकडून अंदाजपत्रकासंबंधी माहिती मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी २०२२ पासून प्रशासकीय राजवट लागू झाली होती. या कालावधीत सलग तीन अर्थसंकल्प प्रशासकांकडून सादर करण्यात आले. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापालिकेचा कारभार प्रशासकीय पातळीवरच चालविण्यात आला आणि आर्थिक नियोजन, विकासकामे तसेच निधीवाटपाचे निर्णय प्रशासकांच्या माध्यमातून घेण्यात आले. मात्र, आगामी मार्चमध्ये सादर होणारा अर्थसंकल्प लोकप्रतिनिधींकडून मांडला जाणार आहे.
लेखा व वित्त विभागामार्फत सर्व विभागांना आगामी वर्षातील उत्पन्नाचे स्रोत, खर्चाचे नियोजन आणि नवीन विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक विभागाकडून मागील वर्षातील प्रत्यक्ष खर्च, अपेक्षित महसूल, करआकारणी, शासनाकडून मिळणारी अनुदाने तसेच भांडवली व महसुली खर्चाचा सविस्तर तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच सध्या सुरू असलेली विकासकामे, अपूर्ण प्रकल्प, तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी स्पष्टपणे नमूद करण्यास सांगण्यात आले आहे. शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कामांना प्राधान्य देऊन प्रस्ताव मांडण्यावर भर देण्यात आला आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.