पिंपरी-चिंचवड

नगरसेवकांची खरी कसोटी सुरू

CD

अमोल शित्रे
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २४ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. प्रचारादरम्यान दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरविण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर उभे ठाकले असून, प्रलंबित नागरी प्रश्न सोडविण्याची नागरिकांकडून अपेक्षा वाढली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. हे प्रश्न सोडविताना नुकतेच निवडून आलेल्या नगरसेवकांचा कस लागणार आहे.
प्रचारासाठी घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्याने आता प्रत्यक्ष काम सुरू होताच आश्वासनांची पूर्तता कितपत होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी विकास, पारदर्शकता आणि तत्काळ निर्णयक्षमतेच्या अपेक्षेने नगरसेवकांना निवडून दिले आहे. केवळ आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय कुरघोडी न करता ठोस कामे होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अनेक प्रभागांत अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात पाणी साचणे, सांडपाणी वाहिनी तुंबणे, कचरा उचलण्यात होणारा विलंब, अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक कोंडीची वाढती समस्या कायम आहे. विकास आराखड्यातील रखडलेले डीपी रस्ते, उद्याने, दवाखाने, शाळा तसेच क्रीडा मैदानांची आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रशासन आणि जागा मालक यांच्यात समन्वय साधावा लागणार आहे. या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याची जबाबदारी नव्या नगरसेवकांवर आहे. यासोबतच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावा लागणार आहेत.

मैदानात उतरून काम करावे लागणार
महापालिका प्रशासनाशी समन्वय साधत निधी मिळवणे, विकासकामांना गती देणे आणि नागरिकांशी थेट संवाद ठेवणे, यासाठी नगरसेवकांचा कस लागणार आहे. तसेच, समाज माध्यमांवर सक्रिय राहून केवळ प्रसिद्धीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे लागणार आहे. आजपर्यंत निवडून येण्यासाठी लोकांच्या मनात प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी समाज माध्यमांवरुन आकर्षक पोस्ट, आश्वासने, नागरिकांशी निगडित समस्या असे तत्सम फोटो अपलोड करून नागरिकांचा निवडून येण्यासाठी नागरिकांना विश्वास संपादन केला. मात्र, तोच विश्वास सार्थ ठरवण्यासाठी नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते जातीने सोडवावे लागणार आहेत.

प्रश्नांकडे दुर्लक्ष कराल तर मनातून उतराल

निवडून आलेल्या नगरसेवकांची विश्वासार्हता पुढील पाच वर्षांच्या कारकिर्दीवर ठरणार आहे. प्रलंबित नागरी प्रश्न, नवीन मागण्या व दिलेली आश्वासने कितपत मार्गी लागतात, यावरच नगरसेवकांची पुढील राजकीय वाटचाल अवलंबून राहणार आहे. अन्यथा लोकांच्या मनात नकारात्मक प्रतिमा तयार झाल्यास ती सुधारण्याची संधी नगरसेवकांना मिळेलच, याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे नगरसेवकांची आता खरी परीक्षा सुरु झाल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.


महत्त्वाचे मुद्दे

- प्रलंबित नागरी प्रश्नांचे निराकरण ः रस्ते, पाणीपुरवठा, भुयारी गटारे, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा.
- निवडणूक आश्वासनांची अंमलबजावणी ः प्रचारादरम्यान दिलेली आश्वासने प्रत्यक्ष कामातून दिसावीत, अशी नागरिकांची ठाम भूमिका.
- महापालिका प्रशासनाशी समन्वय ः निधीची तरतूद करून तो
मिळवून विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींमधील समन्वय महत्त्वाचा.
- पारदर्शक व उत्तरदायी कारभार ः कामांमध्ये पारदर्शकता राखून भ्रष्टाचारमुक्त आणि वेळेत निर्णय घेण्याची अपेक्षा.
- नागरिकांशी थेट संवाद ः प्रभागस्तरावर नियमित संवाद, तक्रार निवारण आणि लोकसहभाग वाढवण्याची गरज.

---
नियमानुसार घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवले जाणे अपेक्षित आहे. सध्या रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असून, तो वेळेत उचलला जावा. रस्त्यांची कामे शंभर टक्के मार्गी लागावीत, तसेच रखडलेले विकास आराखड्यातील (डीपी) रस्ते विकसित व्हावेत. शहराला स्मार्ट सिटी म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक भागांत परिस्थिती विदारक असल्याचे चित्र दिसून येते. किमान दररोज पाणीपुरवठा होणे आवश्यक असून, पवना जलवाहिनी प्रकल्प तातडीने मार्गी लागावा. राज्यानंतर आता महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता स्थापन होत असताना जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. शहरात नियमित, पूर्ण दाबाने व दररोज पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे. ‘टॅंकरमुक्त सोसायटी व टॅंकरमुक्त शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावेत.’
- विनोद सुर्वे, पिंपळे सौदागर
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: श्रीनगरच्या मालपोरा भागात दोन निवासी घरांना आग लागली

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT