पिंपरी-चिंचवड

सूर्यनमस्कार महोत्सवात आरोग्य, संस्काराचा जागर

CD

चिंचवड, ता.२५ ः पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आशाकिरण सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केशवनगर येथे जागतिक सूर्यनमस्कार महोत्सवाचा भव्य उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात शेकडो विद्यार्थी, नागरिक, महिला, युवक तसेच योग शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महोत्सवाचे यंदाचे १२ वे वर्ष ठरले.
मोरया गोसावी क्रीडांगणावर हा महोत्सव झाला. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त (क्रीडा) पंकज पाटील, शिक्षण विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण अधिकारी संगीता बांगर, संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण पालमकर, डॉ. अलका कुलकर्णी, मुख्य योग शिक्षिका निर्मल गुप्ता, बाळासाहेब साठे, पतंजली योग समितीचे डॉ. अजित जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले, ‘‘रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो. सूर्यनमस्कार हा केवळ व्यायाम नसून आरोग्य, सकारात्मकता आणि ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्य आपल्या सात घोड्यांच्या रथातून उत्तरायण प्रवास सुरू करतो, अशी भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धा आहे. त्यामुळे सूर्यनमस्काराला विशेष महत्त्व आहे.’’
विद्यार्थ्यांकडून भगवतगीतेचे पठण करण्यात आले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना टी शर्ट, भगवद्गीता पुस्तक आणि खाऊवाटप करण्यात आले. प्रास्ताविकात पालमकर यांनी उपक्रमाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. प्रशांत गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. संगीता बांगर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारात डोनाल्ड ट्रम्प यांचाच खोडा, लीक ऑडियो क्लिपमध्ये धक्कादायक खुलासा

Pune News : पत्नी उच्चशिक्षित, नोकरी करतेय; कोर्टाने पोटगीचा दावा फेटाळला, तिचे आरोप सामान्य कुरबुरींसारखे

Shubhanshu Shukla : अंतराळात तिरंगा फडकवणाऱ्या शुभांशु शुक्लांना अशोक चक्र; अंतराळ स्थानकाचा प्रवास करणारे इतिहासातले पहिले भारतीय

बिग बॉसच्या घरात आला Wild card सदस्य, दारातून येणारी ‘ती’ व्यक्ती कोण? चाहत्यांचा अंदाज खरा असेल?

Latest Marathi news Update : परेडमध्ये एचएमआरव्ही प्रदर्शित, भारतीय नौदलाच्या मार्चिंग तुकडीचाही सहभाग

SCROLL FOR NEXT