पिंपरी, ता. २७ : श्री क्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रिझर्व्ह बँक, मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक धनंजय भसे यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले.
यावेळी आशा भसे, लष्कर व नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी डॉ. उदयसिंग परदेशी, लेखक दत्तात्रेय अत्रे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशनचे उपाध्यक्ष ॲड. महेश घोडके, शारदा फाउंडेशन मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष शंभु कोलते, प्रगतशील शेतकरी भागुजी काळोखे, उपप्राचार्या शैलजा स्वामी, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली. शारीरिक शिक्षणाचे शिक्षक मायकल डेव्हिड व प्रतीक पांचाळ यांनीही कराटेची प्रात्यक्षिके सादर केली. ‘भारतातील ऐतिहासिक स्मारके’ या संकल्पनेवर आधारित विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी प्रास्ताविक केले. सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहशिक्षक हिमांशु झा व पूनम ढाकोळ यांनी सूत्रसंचालन केले. योगिता उचाडे यांनी आभार मानले.
PNE26V90039
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.