पिंपरी-चिंचवड

उद्योगनगरीला सांस्कृतिक क्षेत्रातही पुढे नेणारा नेता

CD

पिंपरी, ता. २८ ः पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलविणारे व येथील विकास करणारे अजित पवार यांनी सांस्कृतिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरासोबत अजित पवार यांचे वेगळे नाते होते. त्यामुळे येथे भौतिक सुखसुविधा पुरविण्यासोबतच सांस्कृतिकदृष्ट्या शहर पुढे कसे जाईल, याबाबतही ते दक्ष होते. एखाद्या कार्यक्रमाला हजर नसले चोख नियोजन करणे ही त्यांची खासियत होती. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी ते एक अदृश्‍य शक्ती प्रमाणे काम करत होते, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक क्षेत्रात उमटली. त्यांच्या जाण्याने शहराची सांस्कृतिक हानी झाल्याचीही भावना अनेकांनी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड शहरात पहिले नाट्यगृह उभे राहिले ते प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या संकल्पनेतून. त्यानंतरच्या काळात भोसरीतील अंकुशराव काकडे नाट्यगृह, पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर, नटसम्राट निळू फुले रंगमंदिर या वास्तू अजित पवार यांच्या कारकिर्दीत उभ्या राहिल्या. एवढेच नाही तर शहरात नाट्य संकुलासाठी जागा देण्याबाबतची घोषणाही त्यांनी सहा महिन्यांपूर्वी केली होती. त्याचा पाठपुरावाही ते संबंधित अधिकाऱ्यांकडून करत होते.
शहरात ११९६ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा सुरू झाली. त्याचे उद्‍घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत येथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडले. त्यामुळे शहरातील सांस्कृतिक चळवळीला बळ मिळाले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यासोबत अजित पवार यांचे मोठे योगदान होते. कोणतीही गोष्ट सांगून न करता ते कृतीशीलतेतून दाखवून देत. नुकत्याच झालेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे संपूर्ण नियोजन त्यांचे होते, मात्र ते उपस्थित राहू शकले नाहीत, असे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.
अजित पवार यांचे प्रशासनाइतकेच शिक्षण, खेळ व सांस्कृतिक क्षेत्राकडेही लक्ष होते. शहरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थिती लावायचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संगीत अकादमीची २००१ मध्ये स्थापना झाली यावेळी अजित पवार हे यांचा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात प्रवेश झाला होता. त्यामुळे शहरातील मुलांना कलेचे धडे घेण्यासाठी पुण्यात जावे लागू नये अशी भूमिका पवार यांची होती, अशी प्रतिक्रिया आमदार अमित गोरखे यांनी दिली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...

Latest Marathi News Live Update : नितीश कुमार हे काही महिन्यांसाठीच मुख्यमंत्री होतील हे मी आधीच सांगितले होते- संजय राऊत

Pune Property Prices : पुणेकरांना धक्का ! घरे होणार महाग, शहर आणि ग्रामीण भागातील रेडीरेकनर दरात तब्बल 'इतक्या' टक्क्यांची वाढ ?

Post Holi Detox: होळीनंतर शरीर डिटॉक्ससाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

SCROLL FOR NEXT