पिंपरी-चिंचवड

आयटी कर्मचारीही झाले भावुक

CD

पिंपरी ः अजित पवार यांची ओळख ही कायमच कामाचा उरक असलेला नेता अशी राहिली आहे. पहाटे लवकर दौरे करायचे, अधिकाऱ्यांना सूचना द्यायच्या ही त्यांची कामाची पद्धत होती. याचीच प्रचिती हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या आयटी अभियंत्यांना काही महिन्यांपूर्वी आली होती. हिंजवडीतील रस्ते, वाहतूक कोंडी व इतर समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीला जुलै महिन्यात दोनदा भेट दिली होती. अगदी पहाटे दिलेल्या भेटीत त्यांनी रहिवासी, आयटी कर्मचारी व आयटी फोरमच्या सदस्यांकडून त्यांच्या समस्या समजून घेतल्या होत्या. अवघ्या दोन भेटींमध्ये त्यांनी आयटीयन्सची मने जिंकली होती. त्यांच्या अकाली निधनानंतर आयटीयन्समध्येही हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याच्या चित्रफिती, रिल्स सोशल मिडीयावर शेअर करत यातून आयटीयन्सनी श्रद्धांजली वाहिली.
गेल्या वर्षी पावसाळ्यात हिंजवडीत पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी समस्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या बैठकीला अजित पवारही उपस्थित होते. या बैठकीनंतर दोनच दिवसांमध्ये अजित पवार यांनी हिंजवडीला भेट दिली. केवळ हिंजवडीच नाही तर चाकण येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्यांनी त्या भागातही दौरे केले. आयटी पार्कची कोंडी फोडा असे स्पष्ट आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. अजित दादांनी लक्ष घातले म्हणजे आता येथील समस्या सुटतील अशी अपेक्षा आयटीयन्स व कर्मचारी वर्गाकडून व्यक्त होत होती.
---
संघटनेची प्रतिक्रिया
दादा, तुम्हाला आम्ही पुन्हा आयटी पार्कमध्ये बोलावणार होतो. तुम्ही आमच्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे नेहमी ऐकून घेतले. आपले आयटी पार्क, आपले पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर एक नंबर होण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील होता. आज आमच्या सर्वांचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज या संघटनेने व्यक्त केली आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT