अजित पवार यांच्या निधनाने एक धुरंधर व स्पष्टवक्ता नेता तसेच प्रजाहितदक्ष, विकासाभिमुख राज्यकर्त्याला आपण मुकलो आहोत. कामाप्रति त्यांचे समर्पण वाखाणण्याजोगे होते. एक कार्यक्षम प्रशासक म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात अजितदादा अजरामर तर झालेच आहेत, पण त्यांच्या कार्यशैलीचा आदर्श भारतवर्षाच्या भविष्यकाळातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. अशी माणसे नेते म्हणून खूप काळाने निर्माण होतात. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राची आणि खास करून पुणे, पिंपरी चिंचवडची खूप मोठी हानी झाली आहे. तळागाळापर्यंत पोहोचत शाश्वत विकासाचे स्वप्न पाहत आणि ते सत्यात उतरविण्यासाठी सतत झटणाऱ्या कणखर नेतृत्वाची पोकळी न भरून निघणारी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
- राजेंद्र घावटे, साहित्यिक
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.