पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

पानटपरी चालवणाऱ्या महिलेकडे
खंडणी मागितल्याने एकाला अटक
पिंपरी : पानटपरी चालवणाऱ्या महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन पाचशे रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. भोसरीतील लांडेवाडी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी लांडेवाडीतील ५० वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सचिन डॅनियल खलसे (रा. म्हसोबा मंदिराजवळ, लांडेवाडी, भोसरी) याला अटक केली. टपरीवर येऊन आरोपीने सिगारेट व पाण्याची बाटली घेतली. महिलेने पैसे मागितले असता आरोपीने शिवीगाळ केली. टपरी चालवायची असेल तर दरमहा ५०० रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्याने दिली. हप्ता दिला नाही तर टपरी जाळून टाकीन व मारून टाकीन, अशी धमकी देत आरोपीने पाचशे रुपये वसूल केले.
------------------------
दुचाकीच्‍या धडकेत
पादचारी वृद्धाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू झाला. निगडीतील स्पाईन रस्त्यावर ही दुर्घटना घडली. मारुती धोंडिबा पवार (वय ७०) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी सचिन मारुती पवार (रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी राजू दहिहंडे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली. फिर्यादीचे वडील मारुती पवार चिकन चौक ते त्रिवेणीनगर चौक या रस्त्याने पायी जात होते. दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
--------------------------

जमीन विक्रीच्या बहाण्याने फसवणूक
पिंपरी : मुळशी तालुक्यातील माण परिसरात जमीन विक्रीच्या बहाण्याने एकाची फसवणूक करण्‍यात आली. याप्रकरणी ओंकार अशोक अष्टेकर (रा. कोथरूड, पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला. आरोपी महिलेने फिर्यादीला एक जागा विकण्याचे कबूल केले. फिर्यादीच्या बँक खात्यातून तिने चार लाख ५३ हजार रुपये जमा करून घेतले, तसेच २७ लाख ४७ हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. त्यानंतर स्टॅम्प पेपरवर नोटराईज ताबा साठेखत करण्यात आले. व्यवहार पूर्ण झाला नाही तर पैसे परत देण्‍यासाठी पुढील तारखांचे धनादेशही फिर्यादीला देण्यात आले. नंतर आरोपी महिलेने व्‍यवहार पूर्ण केला नाही. त्‍यामुळे फिर्यादीने धनादेश बँकेत जमा केले, पण ते ‘बाऊन्स’ झाले. त्यानंतरही आरोपीने पैसे परत केले नाहीत, तसेच जागेचाही ताबा दिला नाही.
------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT