पिंपरी-चिंचवड

अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला मिळणार नवे बळ

CD

पिंपरी, ता. ३१ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या निधनाच्या धक्‍क्‍यातून सावरत पक्षाला उभारी देण्याचे नवे आव्‍हान शहर राष्ट्रवादी काँग्रेससमोर उभे राहिले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या राज्‍यातील नेतृत्वाच्या भूमिकेकडे आशेने पाहत आहेत. उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार यांना जबाबदारी मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या पालकत्वाची धुरा शहराकडे वळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवड हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात होता. मध्यंतरीच्या काळात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून गेले असले, तरी अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग आजही शहरात सक्रिय आहे.
नुकत्‍याच झालेल्‍या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने ३७ नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळे शहराच्या राजकारणात राष्ट्रवादीची पकड उल्लेखनीय आहे. मात्र, अजित पवारांच्‍या विमान अपघातामधील निधनानंतर शहर राष्ट्रवादीला पुढे नेणारा राज्‍य पातळीवरचा नेता कोण, असा प्रश्न काही उपस्थित राहिला होता. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री म्‍हणून शनिवारी (ता. ३१) सुनेत्रा पवार यांनी सूत्रे हातात घेतल्याने पक्षात नवे चैतन्य निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी स्वतः लक्ष घालत उमेदवारीवर चर्चा केली होती. संभाव्य उमेदवारांच्या भेटी, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, तसेच प्रचाराच्या नियोजनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे त्या केवळ पदावरून नव्हे, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या नेत्या म्हणून कार्यकर्त्यांमध्ये ओळख निर्माण झाली आहे. आगामी काळात सुनेत्रा पवार शहरात लक्ष घालून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देतील, अशी भावना व्यक्त होत आहे. शहरातील संघटनात्मक बांधणी, नाराज घटकांना पुन्हा जोडणे आणि पक्षाला नव्याने ताकद देणे, या जबाबदाऱ्या त्या पार पाडतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीसाठी आगामी काळ निर्णायक ठरणार असून, सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेवर शहराच्या राजकारणाची दिशा ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या निधनानंतर बसलेल्‍या धक्‍क्‍यातून अद्यापही पदाधिकारी सावरलेले नाहीत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्‍यांच्‍याशी महापालिकेत गटनेता निवडीबाबतच सध्या चर्चा होईल. बाकी पक्षाच्‍या इतर बाबींवर बोलण्याची आत्‍ता कोणाची मानसिकता नाही. त्‍यांच्‍याशी नंतर चर्चा केली जाईल.
- योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड

आई वडिलांप्रमाणे पवार कुटुंबीयांनी शहरात लक्ष दिले होते. अजित पवार यांनी पालकत्‍व घेतले होते. त्‍यांच्‍या निधनानंतर आईच्‍या रूपात मोठ्या वहिनी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे शहराच्‍या पालकत्‍व निश्‍चितच स्‍वीकारतील. पवार असतील तरच पक्ष एकसंध राहील अशी आमची भावना आहे.
- भाऊसाहेब भोईर, ज्‍येष्ठ नगरसेवक

सुनेत्रा पवार यांनी यापूर्वीच शहरात लक्ष घालायला सुरूवात केली होती. महापालिका निवडणुकीत त्‍यांनी पदाधिकाऱ्यांच्‍या बैठका, भेटी गाठी घेऊन महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगामी काळातही पक्षातील पदाधिकाऱ्यांना त्‍या बळ देतील. सर्व प्रश्‍न सोडवतील.
- संदीप वाघेरे, नगरसेवक

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बलाढ्य नेते होते. त्‍यांच्‍या जाण्याने मोठी ताकद गेली आहे. मात्र सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्‍यामुळे निश्‍चितच पदाधिकाऱ्यांना बळ मिळेल. आम्‍ही पक्षासोबत कायम आहोत.
- राहुल भोसले, नगरसेवक
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

Music Therapy for Stress Relief: संगीताच्या सहाय्याने तणावमुक्ती; ‘एमएमआर’मध्ये वैदिक ज्ञानावर आधारित अनोखे हेल्थ सेंटर

"आम्हाला, त्याची गरज होती, आम्ही आनंदी..."! पाकड्या अबरारला करारबद्ध करण्याचा SRH कडून बचाव; विसरले, भारताचा केलेला अपमान

LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

SCROLL FOR NEXT