पिंपरी, ता.१ : बनावट कागदपत्राच्या आधारे खोटे खरेदी खत तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दुय्यम निबंधक कार्यालय, वडगाव मावळ येथे घडला.
या प्रकरणी प्रवीण गजानन वाडेकर (रा. बाणेर) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रकाश आगतराव गंगावणे (रा. वरुडा, जि. धाराशिव), देवकुमार शेषराव जाधव (रा. मुखेड, जि. नांदेड), सुधीर समाधान अवसरमोर (रा. धनाज खुर्द, अकोला) व एक अज्ञात महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या पत्नीच्या नावावर असलेली कुसगाव येथील जमीन विक्री करण्यासाठी अज्ञात महिलेस उभे केले. तिच्याकडील बनावट आधारकार्ड, पॅन कार्डचा वापर करून खोटे खरेदीखत तयार केले. तसेच दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ येथे नोंदणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.