पिंपरी-चिंचवड

केंद्रीय अर्थसंकल्पावर पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया

CD

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा पायाभूत सुविधा, उद्योगवृद्धी व कौशल्य विकासावर भर देणारा आहे. यातून पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक प्रगतीला मोठे बळ मिळणार आहे. लघु उद्योगांसाठी अतिरिक्त क्रेडिट गॅरंटी, हाय-स्पीड रेल्वे, स्मार्ट सिटी निधी, ‘पीएलआय २.०’ आणि स्किल डेव्हलपमेंटमुळे रोजगार, गुंतवणूक व कनेक्टिव्हिटी वाढेल. हा अर्थसंकल्प शहरासाठी खऱ्या अर्थाने ‘गेमचेंजर’ ठरेल.
- अमित गोरखे, आमदार, भाजप

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा लघु उद्योग, कौशल्य विकास, निर्यात व पायाभूत सुविधांवर भर देणारा संतुलित आहे. औद्योगिक क्लस्टर, एमएसएमई ग्रोथ फंड व कौशल्य विकासाच्या योजनांचे स्वागत आहे. मात्र, जाहीर योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच हा अर्थसंकल्प यशस्वी ठरेल.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना

केंद्रीय अर्थसंकल्प कष्टकरी, रुग्ण व मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे. कर्करोग व दुर्मिळ आजारांच्या औषधांवरील सवलत, पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना यामुळे सामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारेल, असा विश्वास आहे.
- डॉ. बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी जनता आघाडी

आत्मनिर्भर, उद्योगाभिमुख व युवकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे. देशांतर्गत उत्पादन, रोजगार, फार्मा, एमएसएमई व ग्रामीण उद्योगांना चालना मिळेल. मात्र, कररचनेत व इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल न झाल्याने करदात्यांना दिलासा मिळाला नाही.
- गोविंद पानसरे, अध्यक्ष, एमएसएमई फेडरेशन, पिंपरी चिंचवड

हा अर्थसंकल्प कष्टकरी, असंघटित क्षेत्र व सामान्य जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा असून सामाजिक न्यायाऐवजी कॉर्पोरेट हितसंबंधांना प्राधान्य देणारा आहे. किमान वेतन, रोजगार, घरकुल व कामगार कल्याणाबाबत ठोस तरतूद नाही.
- काशिनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ

हा अर्थसंकल्प करदाते, युवक, शेतकरी व कामगारांच्या अपेक्षांवर अपयशी ठरलेला आहे. महागाई, रोजगार, शिक्षण व उत्पन्नवाढीबाबत ठोस उपाय नाहीत. हे बजेट दिशाहीन व जनतेच्या विरोधातील आहे.
- संदेश नवले, समन्वयक, काँग्रेस, पिंपरी चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

जॉस बटलर निवृत्ती घेणार? T20 World Cup मधील खराब कामगिरीवर अखेर सोडलं मौन; म्हणाला, 'जसं असेल, तसं...'

धुरंधर २ रिलीज होताच दिग्दर्शकाला मागावी लागली माफी, म्हणाले...'आम्ही रात्रभर प्रयत्न करुनही...'

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT