पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

चेंबरची दुरुस्ती करावी
मोरवाडी येथील मोरजाई चौकासमोरील कमान जवळील चेंबरचे झाकण तुटले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालक तसेच नागरिकांना अंधारात हे चेंबर नजरेस न आल्यास अपघात होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने या चेंबरची तत्काळ दुरुस्ती करावी.
- दीपक भोजने, मोरवाडी
PNE26V91980

पूर्णानगर येथील उद्यानाची दुरवस्था
पूर्णानगर येथील स्व. पंडित दीनदयाळ उपाध्ये क्रीडांगण, उद्यानामधील हिरवळ कित्येक वर्षा पासून हरवली आहे. नियमित देखभाल व झाडांना पाणी न दिल्याने हिरवळ नाहीशी झाली आहे. येथील ‘स्प्रिंकलर सिस्टिम’ कार्यरत नाही. संवर्धन, संगोपनासाठी नियमित कर्मचाऱ्याचा अभाव, नियमित कचरा उचलत नाही. पालिकेच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष हे येथील समस्येचे मूळ कारण आहे. उद्यान विभागाने येथे दैनंदिन उद्यान स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.
- सुनील कदम, पूर्णानगर
PNE26V91983

प्रवाशांची गैरसोय
पीएमपीएमएल ही सार्वजनिक प्रवासी सेवा कंपनी शहरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने राबविली आहे. परंतु ही योजना आता त्रासदायक ठरत आहे. कारण सतत अनेक ठिकाणी कामानिमित्त रस्ता उखडला जातो, त्यासाठी अनेक महिने रस्ते बंद असतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये बीआरटी मार्गातून बस कमी आणि इतर वाहनेच जास्त जातात. काही बसथांबे भिकारी, मद्यपी यांचे आश्रयस्थान झाले आहे. यावर संबंधित प्रशासनाने, नवनिर्वाचित महापौर आणि नगरसेवकांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
PNE26V91985

चेंबरवर झाकण बसवावे
रावेत येथील चंद्रभागा कॉर्नर परिसरात मागील काही दिवसांपासून एक चेंबर उघड्या अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिक आणि लहान मुलांना येथून जाताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने त्वरित या समस्येची दखल घेऊन या चेंबरवर झाकण बसवावे.
- समाधान गायकवाड, रावेत
PNE26V91988

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : पुणे-बंगळूर महामार्गावर प्रवास करताय? उंब्रजच्या 'त्या' जीवघेण्या कोंडीतून आता कायमची सुटका, गडकरींकडून 133 कोटींच्या 'सिंगल पिलर' पुलाला मंजुरी!

Nagpur Crime News : कामठीत बनावट नोटांचा पर्दाफाश; तीन व्यापाऱ्यांना अटक, कसा उघडकीस आला प्रकार?

Women’s Day Finance Planning: महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी टर्म विमा आणि निवृत्ती नियोजन का आवश्यक?

Baba Khan: धाड.. धाड.. धाड.. घरावर बेछूट गोळीबार; घटनेत पोलीसही जखमी, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरसोबत काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

Stroke Summit: भारतामध्ये मृत्यूचे चौथे मोठे कारण स्ट्रोक! उपचारांसाठी प्रगत क्रिटिकल केअरची गरज; तज्ज्ञांचे समिटमध्ये मत

SCROLL FOR NEXT