पिंपरी-चिंचवड

शालेय जगत

CD

प्रियदर्शनी शाळेत विज्ञान प्रदर्शनास प्रतिसाद
प्रियदर्शनी शाळा, मोशी येथे इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. पर्यावरण संरक्षण, अक्षय्य ऊर्जा, अवकाश विज्ञान, आरोग्य व दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञान या विषयांवर आधारित विविध मॉडेल्स व प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले.पालक व उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे कौतुक केले. या विज्ञान प्रदर्शनातून शाळेची अनुभवाधारित व सर्वांगीण शिक्षणाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली.

सशस्त्र दलातील करिअर
प्रियदर्शनी शाळेत विद्यार्थ्यांसाठी ‘सशस्त्र दलातील करिअर’ विषयावर करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. या सत्राचे मार्गदर्शन लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) समीर कुलकर्णी यांनी केले. त्यांनी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील विविध करिअर संधींबाबत सविस्तर माहिती दिली. सैन्य सेवेत शिस्त, समर्पण आणि देशभक्तीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. अशा विविध प्रवेश परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शारीरिक तंदुरुस्ती, नेतृत्वगुण आणि मानसिक कणखरतेवर त्यांनी विशेष भर दिला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अनेक प्रश्न विचारले.

श्री सरस्वती विद्यालय, आकुर्डी
आकुर्डी येथील श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सहशिक्षक संजय जगताप यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक प्रा. गोविंद दाभाडे उपस्थित होते. विद्यालयाच्या प्राचार्या संगीता गुरव, सरस्वती प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजू माळे, उप-प्राचार्य विजय बच्चे, पर्यवेक्षक संजय कांबळे, कैलास पोंदे उपस्थित होते. यावेळी शिक्षिकांनी ईशस्तवन, स्वागतगीत सादर केले. नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक प्रा. गोविंद दाभाडे यांनी संजय जगताप यांना सन्मानित केले. प्रास्ताविक गणेश भोने यांनी केले. सूत्रसंचालन शीतल शिंदे व धैर्यशील लावंड यांने केले. आभार संजय देवरे यांनी मानले.

श्री दादा महाराज नाटेकर विद्यालयाचे स्नेहसंमेलन
श्री दादा महाराज नाटेकर पंचकोषाधारित विद्यालय, प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन टाऊन हॉल चिखली येथे उत्साहात पार पडले. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही मध्यवर्ती कल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरण केले. प्रमुख पाहुण्या म्हणून चिंचवडच्या माटे विद्यालयाच्या संचालिक इंद्रायणी माटे, यांच्यासह संस्थेचे डॉ. तेजस यशवंत, डॉ. वैशाली जोशी, मुख्याध्यापिका वैशाली नरवडे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर केले. तसेच ‘नवस’ आणि ‘मी पृथ्वी बोलते...’ ही नाटिकादेखील सादर केली. आकाश माळी व वनिता शियेकर यानी नृत्य दिग्दर्शन, तर पालक विलास गुंजाळ यांनी नाट्य दिग्दर्शन केले. स्नेहसंमेलन प्रमुख म्हणून शीतल गुंजाळ यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा बोराडे, निर्मला साळवे, पूजा कोळेकर, नयना मावळे, अर्चना हिलाल, संगीता खडकेकर, साक्षी चव्हाण, नूतन पाटील, सोनाली सकुंडे, ज्योती कोरटकर, रोशनी इंगळे, सुमन मुखेकर, साधना खुळे, आत्माराम बोराडे, उन्मेश कुलकर्णी, स्वाती अष्टेकर, प्रीती पैठणकर यांनी पुढाकार घेतला.
PNE26V91993

यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्य स्पर्धा
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्य स्पर्धेत पिंपरी चिंचवड तालुकास्तरावर आकुर्डीतील श्री सरस्वती माध्यमिक विद्यालयाने इयत्ता पाचवी ते दहावी गटात द्वितीय क्रमांक पटकावला. ‘मातीतील साधी माणसं’या विषयावर आधारित सामाजिक नाटक सादर करण्यात आले होते. ही स्पर्धा सीएमएस इंग्लिश मीडियम स्कूल निगडी या शाळेत घेण्यात आली. या नाटकाचे दिग्दर्शन संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. डॉ. गोविंद दाभाडे यांनी केले. नाट्य लेखन सारिका आस्मर यांनी केले. त्यांना यासाठी प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाटकातील गौरी लोंड व समीक्षा कांबळे यांना उत्कृष्ट अभिनयासाठी गौरविण्यात आले. भूगोल अभ्यास व परीक्षा केंद्र नवी मुंबई यांच्यामार्फत राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती. या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थिनी धनश्री राऊत-प्रथम, श्रुती पवार व अनुष्का कदम यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
PNE26V91996

एच.ए. शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा
एच.ए. शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ पार पडला. उपमुख्याध्यापिका आशा माने यांनी ‘शाळा हा आयुष्य घडवण्याचा पाया आहे. शाळेमुळे मुलांची भावनिक, बौद्धिक व शारीरिक वाढ होऊन मुले पुढचे आयुष्य झेलण्यासाठी तयार होत असतात,’ असे मार्गदर्शन केले. तर, ज्येष्ठ शिक्षक जितेंद्र बोडरे म्हणाले, ‘‘परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सकारात्मक मानसिकता तसेच वेळ याचे भान ठेवले पाहिजे.’ यावेळी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कपिल पाटील, पालक प्रतिनिधी, पर्यवेक्षिका मनीषा कदम, शिक्षक प्रतिनिधी विजया तरटे, क्रीडा शिक्षक पी.जी. माने उपस्थित होते.
PNE26V91994


मॉडर्न हायस्कूल, निगडी
यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यमाच्या बालवर्ग ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न झाले. यावेळी चैतन्य महाराज वाडेकर, अध्यक्ष दीपक मराठे, पर्यवेक्षक डॉ. अतुल फाटक, प्राथमिक विभागाचे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रा. डॉ. शशिकांत ढोले, मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गौरी सावंत उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली सरस्वती वंदना, बासरी आणि पखवाज वादन, नृत्य अशा विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

संचलन स्पर्धेतून जवानांना मानवंदना
लष्करातील जवानांच्या शौर्य, त्याग आणि शिस्तीला मानवंदना देण्यासाठी संचलन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सैन्य दिनानिमित्त आयोजित ही स्पर्धा मस्केटियर्स युथ फाउंडेशनच्या पुढाकाराने पार पडल्या. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक नरेंद्र अहिरे, कर्नल नितीन रुमाळे, प्रताप भोसले, शुभांगी सरोटे, स्मिता माने उपस्थित होते. मॉडर्न इंग्रजी माध्यम हायस्कूलच्या पथकाची शिस्तबद्धता, एकसंघपणा, संचलन सुसूत्रता, कमांडरचे नेतृत्व यामुळे निगडी विभागात प्रथम क्रमांक आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक मुख्याध्यापिका गौरी सावंत, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्रा. डॉ. जोत्सना एकबोटे, सेक्रेटरी प्रा. डॉ. श्यामकांत देशमुख, शाळा समितीचे अध्यक्ष दीपक मराठे, व्हिजिटर प्रा. डॉ. अतुल पाठक यांनी केले. क्रीडा शिक्षक मधुकर रासकर आणि ममता गाडे यांनी संचलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT