पिंपरी, ता. ४ ः विद्यार्थिनींमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती रुजविण्यासाठी ‘राष्ट्र प्रथम’ अभियानांतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पाऊल उचलले आहे. या मुलींना माजी सैनिकांमार्फत लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी खास योजना आखली आहे. दहा हजार प्रबोधनकारांमार्फत विद्यार्थ्यांत राष्ट्रीय विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांसाठी मूलभूत लष्करी प्रशिक्षण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांमध्ये सुरवातीपासूनच देशभक्ती, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या सवयी विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. शालेय क्रीडा शिक्षक, एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) अधिकारी आणि स्काउट्स आणि गाईड्सच्या तुकड्या देखील त्यांच्यात सहभागी होतील. या लष्करी प्रशिक्षण योजनेत शहरातील एक लाखाहून अधिक विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या संकल्पनेत विद्यार्थिनींना मार्शल आर्टस्, योगासने व प्राणायाम या प्रशिक्षणाचा समावेश आहे. १५ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
''राष्ट्र प्रथम'' ही भावना रुजविण्यासाठी पहिलीपासूनच्या विद्यार्थिनींना माजी सैनिकांमार्फत सैनिकी शिक्षण दिले जाणार आहे. हे माजी सैनिक व क्रीडा शिक्षक त्यांना शिस्त, देशभक्ती आणि शारीरिक प्रशिक्षणाचे धडे देतील. विद्यार्थ्यांना आरोग्य कार्ड उपलब्ध करून दिली जातील.
---
या मोहिमांतर्गत नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज केले जात आहे. मुलांच्या मनात देशप्रेम आणि कर्तव्याची भावना जागृत करण्यासाठी हा उपक्रम घेतला जात आहे. शारीरिक व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच्या सवयी त्यांना जीवनात पुढे जाण्यास मदत करतील. माजी सैनिकांच्या मार्गदर्शनाखाली मिळणारे सैनिकी शिक्षण मुलींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनवेल.
- संतोष काळे, कार्याध्यक्ष, पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ
-----
हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांसाठी मूलभूत लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या बांधवाचे मार्गदर्शन मिळणे प्रेरक ठरेल. हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असल्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्यामुळे मुलांमध्ये सुरवातीपासूनच देशभक्ती, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या सवयी विकसित करण्यात मदत होईल.
- संतोष देवकर, पालक, श्री टागोर माध्यमिक विद्यालय इंद्रायणीनगर, भोसरी
-----
फोटो
92733
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.