पिंपरी-चिंचवड

गुन्‍हेवृत्‍त ---------------------------

CD

मद्यपीला घरी पाठविल्याच्या
रागातून तरुणाचे डोके फोडले
पिंपरी : नशेत असलेल्या व्यक्तीला गाडीवर बसवून घरी पाठविल्याच्या कारणावरून दोन भावांनी मिळून एका तरुणाला मारहाण करीत त्याचे डोके फोडले. सोमवारी (ता. २) रात्री ११ वाजता येलवाडीतील हॉटेल कॉर्नरपाशी हा प्रकार घडला. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. जितू कैलास गायकवाड (वय ३५, देहूगाव, ता. मावळ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वैभव अप्पासाहेब उदरभरे (वय ३४), विशाल आप्पासाहेब उदरभरे (वय ३६), अविनाश नामदेव जाधव (वय ३५) आणि वैभव राजेंद्र कोळेकर (वय २६, सर्व रा. देहूगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. वैभव राजेंद्र कोळेकर यांनी जितू कैलास गायकवाड याच्या विरोधात फिर्यादी दिली. वैभव हे त्यांच्या भावाला आणण्यासाठी गेले असता जितूने त्यांच्या गाडीची तोडफोड केली, तसेच यांना मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अधिक तपास दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस करत आहेत.
------

मामुर्डीत तरुणाची फसवणूक
पिंपरी : ऑनलाइन गेमिंगसाठी बँक खाती आणि सिम कार्डचा गैरवापर करून एका तरुणाची फसवणूक करण्यात आली. १ नोव्हेंबर २०२५ ते तीन फेब्रुवारी २०२६ दरम्यान मामुर्डीतील साईनगरमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी सार्थक सुनील चव्हाण (वय २१, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ओमकार अभिजित कदम (वय २२, मामुर्डी, ता. मावळ), अरसद (राजस्थान) आणि राहुल कुमार (राजस्थान) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
-----------
चऱ्होलीत एकाला ४२ लाखांचा गंडा
पिंपरी : हॉटेल व्यवसायातील भागीदारीत चांगला नफा देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीला ४२ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. डिसेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान चऱ्होलीत हा प्रकार घडली. याबाबत धिमन निताई सरकार (वय ४७, रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सुकेश शेखर शेट्टी (वय ३२, वारजे, पुणे) आणि शंकर जगन्नाथ शेट्टी (वय ४२, वारजे, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
-----------
हेद्रुजमध्ये तरुणाला मारहाण
पिंपरी : कौटुंबिक वादातून वडिलांना शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारल्याने एका तरुणाला लाकडी दांडक्याने तसेच लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली. सोमवारी (ता. २) रात्री नऊ वाजता हेद्रुज (ता. खेड) येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी अमोल बबन बच्चे (वय ३३, हेद्रुज) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून लहू एकनाथ बच्चे (वय ३१), पपेश एकनाथ बच्चे (वय ४०), भरत किसन बच्चे (वय ४७) आणि प्रदिप किसण बच्चे (वय ३८, सर्व रा. हेद्रुज) यांच्यावर त गुन्हा दाखल करण्यात आला.
----------
रहाटणीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
पिंपरी : सकाळी फिरायला गेलेल्या दांपत्याला अडवून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार रहाटणीतील नखाते चौकाजवळ मंगळवारी (३ फेब्रुवारी) सकाळी सहा वाजता घडला. याप्रकरणी आत्माराम आबू माने (वय ६४, रहाटणी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी संजय नरसिंह लूनक्का (वय २९, नांदेड) याला अटक केली.
------------

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी : शहरातून तडीपार असूनही बेकायदेशीरपणे वावरणाऱ्या आणि कोयता बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका गुंडाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (ता. ३) सायंकाळी जांबेगाव येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कारभारी पालवे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मुन्ना ऊर्फ जुबेर मौल्ला अत्तार (वय ३६, जांबेगाव, ता. मुळशी) असे आरोपीचे नाव आहे.
------------
वाकडमधील स्‍पा सेंटरवर कारवाई

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने वाकड परिसरातील ‘इटर्नल फॅमिली स्पा’ येथे सोमवारी (ता. २) सायंकाळी छापा टाकून चार पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी ‘स्पा’ व्यवस्थापकाला अटक केली आहे. अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम (वय ३२, रा. विशालनगर, पिंपळे निलख, मूळ रा. जमुनामुख, जि. लंकानागाव, आसाम) असे अटक केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Was Dr. Manisha Jejurkar? नाशिक हादरलं! प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ मनीषा जेजूरकर यांनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य, डॉक्टर नवरा घरात नसताना...

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

SCROLL FOR NEXT