पिंपरी-चिंचवड

पाणीपुरवठा यंत्रणेची महापौरांकडून पाहणी

CD

पिंपरी, ता. ७ ः पिंपरी चिंचवड शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम व सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने महापौर रवी लांडगे यांनी शनिवारी निगडी व चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. शहराला लागणारी एकूण पाण्याची गरज, महापालिकेकडून सध्या होणारा पाणीपुरवठा, तसेच भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता राबविण्यात येत असलेल्या व प्रस्तावित उपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, चीफ केमिस्ट डॉ. प्रशांत जगताप, कार्यकारी अभियंता विजयसिंग भोसले, महेश बरिदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प आणि निघोजे पंपिंग व्यवस्था ही आंद्रा धरणातून थेट जलवाहिनी कार्यान्वित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यात येत आहे, याबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला. तसेच, निगडी जलशुद्धीकरण केंद्रात संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर आढावा घेतला. या केंद्रातून सुमारे ७५ टक्के शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया, गुणवत्ता तपासणीचे निकष आणि वितरण व्यवस्थेची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

अधिकाऱ्यांकडून माहिती
भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, पाणी उचल, शुद्धीकरण व वितरणाची साखळी, पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी प्रक्रिया, शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्यांची क्षमता व स्थिती याबाबत मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे व सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली.

दर्जेदार उपाययोजना करा ः महापौर लांडगे
शहरातील नागरिकांना भविष्यातही नियमित, पुरेशा दाबाने आणि दर्जेदार पाणीपुरवठा होण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकाधिक दर्जेदार उपाययोजना राबविण्यावर भर द्या, अशा सूचना महापौर रवी लांडगे यांनी केली.
---
९३६१४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare: तिन्ही पवारांचा एकत्रित फोटो बघून तटकरे काय म्हणाले? रोहित पवारांना जुन्या भूमिकांची करुन दिली आठवण

Rohit Sharma: इतिहास बदलण्याची वेळ आलीय! T20 वर्ल्ड कपपूर्वी 'हिटमॅन' टीम इंडियाबद्दल काय म्हणाला? वाचा

Mumbai Weather: सकाळी गारवा, दुपारी ऊन... मुंबईत तापमानात बदल, पुढील ३ दिवस कडाक्याचा इशारा; कारण काय?

BCCI Central Contracts : रोहित-कोहलीचं डिमोशन, A+ ऐवजी B ग्रेडमध्ये समावेश? ३० खेळाडूंच्या यादीत कुणाची नावं?

DK Shivakumar Latest News : डीके शिवकुमार मुख्यमंत्री कधी? सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT