पिंपरी-चिंचवड

शहरात श्‍वसनाच्या आजारांच्या प्रमाणात वाढ

CD

पिंपरी, ता. १० ः बदलणारे वातावरण, वाढलेली धूळ यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये श्‍वसनाच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यामध्येही न्युमोनियाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांनी सर्दी खोकला व ताप यासारख्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

बदलत्या हवामानाचा परिणाम
थंडी कमी होऊन सध्या उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. मात्र, सकाळी व रात्री थंड हवामान आहे. या बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम म्हणून नागरिकांमध्ये सर्दी खोकल्याचे प्रमाण वाढत आहे. याचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत आहे. तसेच या आजारांकडे वेळीच उपचार नाही केले तर न्युमोनियाचा धोका वाढतो. त्यामुळे पाच दिवसांपेक्षा अधिक असलेली सर्दी, खोकला आणि ताप आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा न्युमोनियाचे रुग्ण हे थंडीत अधिक आढळून येतात. मात्र, थंडी कमी होऊनही सध्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही.

धुळीमुळे श्‍वसनाच्या आजारांचाही त्रास
थंडी सुरू झाल्यापासून शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच हवेची गुणवत्ता म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स हा १३० ते १५० च्या दरम्यान राहिला आहे. यामध्ये पीएम १० हे मुख्य प्रदूषणाचे घटक आहेत. ही आकडेवारी शहरातील हवामान मध्यम प्रदूषित असल्याचे दर्शवते. सातत्याने हवा खराब असल्याने धुलिकण नाकामध्ये जाऊन अलेर्जेटिक सर्दी, खोकला या आजारांना निमंत्रण मिळत आहे. याचा त्रास मुख्यत्वे सीओपीडी, दमा असणाऱ्या नागरिकांना होत आहे. तसेच धुळीमुळे होणारा हा त्रास सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये आढळून येत आहे.

काय काळजी घ्यावी
- बाहेर पडताना मास्क घालणे आवश्‍यक
- बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवावेत
- थंड पदार्थांचे सेवन टाळावे
- आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा
- सकस आहार घ्यावा

‘अलीकडच्या काही दिवसांमध्ये न्युमोनियाचे रुग्ण वाढले आहेत. ५० वर्षांवरील व्यक्ती, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा किंवा सीओपीडीच्या रुग्णांना न्युमोनियाचा धोका जास्त असतो. त्यामुळे पाच दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला किंवा ताप राहिल्यास तो साधा सर्दी-खोकला समजून दुर्लक्ष करू नये. सतत वाढणारा खोकला, छातीत दुखणे किंवा धाप लागणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.’
- डॉ. विप्लव वैद्य, संसर्गजन्य रोग तज्ज्ञ, आदित्य बिर्ला रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taratala Warehouse Shed: मोठी दुर्घटना! तारातालामध्ये गोदामाचा शेड अचानक कोसळला; ५ जणांचा मृत्यू, ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली दबले

Gadchiroli: लष्करात ट्रेनिंगनंतर पहिल्या ड्युटीवर जाण्याआधीच काळाचा घाला; पहाटे धावायला गेल्यावर टेम्पोची धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; 24 तासांत 21 मिमी सरासरी पाऊस, चार महसूल मंडळांत अतिवृष्टी

'देऊळ बंद २ ने राजा शिवाजीचा रेकॉर्ड मोडू नये' प्रवीण तरडे सिनेमाबद्दल बोलताना म्हणाले...

Pune Traffic jam: हडपसरमध्ये पावसाचा कहर! राडारोडा व खड्ड्यांमुळे सोलापूर–सासवड मार्गावर सहा तास वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT