पिंपरी-चिंचवड

‘वेनकॉब पुणे श्री २०२६’ चा कमलेश आचरा मानकरी

CD

पुणे, ता. १० ः फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिजिक्स स्पोर्ट्स, पुणे आणि पिंपरी चिंचवड शरीर सौष्ठव संघटनेच्या सहकार्याने पुणे येथे आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत कमलेश आचरा हा ‘वेनकॉब पुणे श्री २०२६’ किताबाचा मानकरी ठरला. तर ‘वेनकॉब मेन्स फिजिक्स पुणे श्री २०२६’ चा किताब सुशांत जाधव याने पटकाविला.
महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन संलग्न पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना मान्यतेने ही स्पर्धा भरविण्यात आली.
स्पर्धेचे उद्‍घाटन नगरसेवक प्रसन्न जगताप, पुणे शहर भाजप सरचिटणीस गणेश घोष, धनंजय जाधव यांच्या हस्ते झाले. संयोजक दीपक शिरवळकर यावेळी उपस्थित होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अभय छाजेड, महेश वाबळे, अजय खेडेकर, अलीभाई दारुवाला आदींच्या हस्ते झाले. कमलेश आचरा याला २१ हजार रुपये तर सुशांत जाधव याला ७ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू म्हणून अर्जुन देडे याला तर ‘बोस्ट पोझर’ म्हणून अतुल साळुंके याला गौरविण्यात आले. ‘मोस्ट इम्प्रुव्हड’चा बहुमान संदेश नलावडे याने पटकाविला. स्पर्धेत एकूण १३१ स्पर्धकांनी भाग घेतला.
प्रशांत जगताप, मनीष पोकळे, सागर येवले, मुस्तफा पटेल, गौतम तांबे आदींनी संयोजन केले.

स्पर्धेचे पहिल्या तीन क्रमांकांचे निकाल
वेनकॉब पुणे श्री ः ५५ किलो - अमित चौगुले, फुरकान शेख, अक्षय तांदळे. ६० किलो -
हर्षल काटे, सिद्धेश गाडगे, अमोल यमदे. ६५ किलो - अर्जुन देडे, नीलेश धोंडे, अमोल गावडे.
७० किलो - सचिन सावंत, शुभम मिसाळ, राहुल महादे. ७५ किलो - प्रशांत धोंडे,
ओम शिंदे, प्रथमेश कुंभारकर. ८० किलो - कमलेश आचरा, शुभम गिरी, संदेश होजगे.
८० किलो - संदेश नलवडे, अरबाज शेख, फिरोज शेख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT