बेजबाबदार वाहतुकीवर कडक कारवाई हवी
‘स्टीलच्या सळया मोटारीतून थेट आरपार’ ही बातमी वाचली. अंगावर काटाच आला. अशा बेजबाबदार, बेदरकार आणि असुरक्षित वर्तनामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, याची जाणीव कुणालाही राहिलेली नाही. बेशिस्त वाहतुकीच्या बाबतीत तर पुण्याचा पहिला क्रमांक येईल. मालवाहू टेंपोमध्ये असुरक्षित पद्धतीने सळया भरणाऱ्यापासून तो टेंपो रस्त्यावर चालवणाऱ्या चालकांपर्यंत सगळेच जबाबदार आहेत. ज्या ठिकाणाहून टेंपो निघाला तो दुकानदार, गोदाममालक, व्यापारी आणि टेंपोमालकावरही सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. वाहतुकीला शिस्त लावायची असेल रस्त्यावरील इतर वाहनचालक-पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
- शिवराम वैद्य, निगडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.